उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- आपण आजपर्यंत अनेक आंदोलन बघितली पण सांगलीत एक विचित्र आंदोलन समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात या आंदोलनाची चर्चा रंगली आहे.सांगली येथील महानगर पालिकेत काल राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आज लक्षवेधी आंदोलन केले या आंदोलनामुळे ते चांगलेच चर्चेत आले.
फाईलवर आयुक्तांचा कोंबडा म्हणजेच शेरा पाहिजे असे लेखाधिकारी यानी सांगितले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नगरसेवक असलेले योगेंद्र थोरात यांनी चक्क जिवंत कोंबडा फाईलवर ठेवत अधिकाऱ्यांच्या शेऱ्याकडे लक्ष वेधले. प्रशासन आणि अधिकाऱ्याच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अधिकाऱ्याच्या सही मुळे तर अनेक काम अडकून पडतात. सरकारी काम आणि चार दिवस थांब अशी सर्वत्र ओरड नागरिकात दिसून येते ते उगाच नाही.
सांगली महानगर पालिका मुख्यालयासमोर योगेंद्र थोरात यांनी फाईलवर कोंबडा ठेवत लक्षवेधी आंदोलन केलं. तसेच लेखा विभागात जाऊन लेखाधिकारी केंबले यांच्या केबिन समोर सुद्धा प्रतीकात्मक कोंबडा आंदोलन केले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस नगरसेवक तोफिक शिकलगार उपस्थित होते. या लक्षवेधी आंदोलनाची सांगली महानगरपालिकेत जोरदार चर्चा सुरू होती.

