तिरुपती नल्लाला राजुरा तालुका प्रतिनिधी मो.न. 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथील गुनवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कन्हाळगाव प्रमुख पाहुणे श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव, श्री जिवने सर, श्री जुनगरी सर, सौ भगत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री नारायण हिवरकर यांनी शाळेतुन प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. वैष्णवी दोरखंडे, द्वितीय क्रमांक गणेश ज्ञानेश्वर मरापे, तृतीय क्रमांक कु. पवित्रा अरुण देवतळे या तीन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन, पेढे भरवुन, सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक विद्यार्थ्याने चागंला अभ्यास करून पहिला क्रमांक कसा मिळवता येईल याची जिद्द ठेवावी व पुढील शिक्षण चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवुन पदवीधर व्हावे याची काळजी घ्यावी चांगल्या हुद्द्यावर काम करावे आपल्यावर कुंटुबाने टाकलेला विश्वास सार्थ करावा व आपले भविष्य, आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे असे उदगार यावेळी काढले. तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री जिवने सर यांनी केले तर आभार जुनगरी सर यांनी मानले.

