ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पाचोरा:- आज 6 जून 2023 रोजी समस्त आदिवासी समाजातील संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा निवेदन सादर करण्यात येत असून आहे. जळगाव जिल्ह्यातील मूळ टोकरे कोळी समाजातीलच समाजबांधव यांना जातीचे प्रमाणपत्र देणेबाबत व इतर गैर आदिवासी समाजातील लोकांना जे नामसाधर्म्याचा फायदा घेऊन जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड करत आहेत त्यांना जातीचे प्रमाणपत्र न देणेबाबत लाकिभाऊ जाधव (महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष) अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या नेतृत्वखाली आदिवासी समाजातील सर्व आदिवासी संघटनांनी चोपडा कार्यालय येथे निवेदन दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदन मध्ये मूळ टोकरे कोळी समाजातीलच समाजबांधव यांना जातीचे प्रमाणपत्र देणेबाबत व नामसाधर्म्याचा फायदा घेऊन जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धडपड करणारे लोकांना जातीचे प्रमाणपत्र न देणेबाबत निवेदन सादर केले. सदरील निवेदन अनुसार आदिवासी समाजातील मूळ आदिवासी समाजातील लोकांनाच जातीचे प्रमाणपत्र देणेबाबत सर्व संघटना यांनी समर्थपणे मागणी केली व कोठेही कोळी समाज विरोधात आक्षेपार्ह विधान केलेले नाही किंवा तसा हेतु देखील नाही परंतु आदिवासी समाजातील मूळ आदिवासी समाजातील लोकांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न आज रोजी आदिवासी समाजातील सर्व स्तरातील लोकांना पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजात अर्थाचे गैरसमज व गैरअर्थ करुन कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासाठीचे वातावरण हळूहळू काही लोक तयार करत असून सदरील विषयावर शासन व प्रशासन स्तरावर तातडीने दखल घेऊन सदरील विषयावर तातडीने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सर्व सुशिक्षित तरुण आदिवासी संघटना वतीने देखील करण्यात आहे.उपस्थित संघटना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद , जय आदिवासी युवा शक्ती , आदिवासी टायगर सेना , रावण प्रतिष्ठान, जर आदिवासी नेते या खरा आदिवासी ना मतदानाचा वापर करीत असाल तर त्याला येणाऱ्या निवडणुकीत त्यांना उत्तर देण्यात येईल.

