महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेश:- राज्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यातील बस्ती जिल्ह्यात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भाजपच्या स्थानिक 3 नराधम कार्यकर्त्यांनी सामूहिक बलात्कार केला. या सामूहिक बलात्कार केल्या नंतर या अल्पवयीन मुलीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन भाजपच्या आरोपी कार्यकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहे. तर एक फरार आहे.
एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना 5 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. ही अल्पवयीन मुलगी सायंकाळी बाजारातून भाजी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी कछिया- बिऊपूर या रस्त्यावरील एका शाळेजवळ मुलीचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. मुलीच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. माहिती प्राप्त होताच तडकाफडकी पोलीस तापा घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून तरुणीचा मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविला.
प्राप्त माहितीनुसार, बिरूपूर येथील रहिवासी मोनू निषाद यांनी गावातील एका व्यक्तीला मृतदेहाची माहिती दिली होती. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात मोनू निषाद, राजन निषाद आणि कुंदन सिंह यांच्यावर मुलीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. हे तिन्ही आरोपी भाजपशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार, कुंदन सिंह हे भाजप किसान मोर्चा गौर मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. तर अन्य दोन आरोपी हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांच्या चौकशीत मोनू निषाद याने सांगितले की, तो पीडितेला गेल्या सहा-सात महिन्यांपासून ओळखत होता. 5 जून रोजी सायंकाळी त्याने तिला फोन करून भेटण्यास सांगितले. ज्यानंतर तो ठरल्याप्रमाणे अल्पवयीन मुलीला भाजप किसान मोर्चा गौर मंडळाचे उपाध्यक्ष कुंदन सिंगच्या घरी घेऊन गेला. जिथे तिच्यावर बलात्कार झाला. अत्यंत क्रूरपणे या तिघांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने जास्त रक्तस्त्राव झाला आणि त्यात मुलीचा मृत्यू झाला अशी माहिती पुढे आली आहे. पुढे संतापजनक म्हणजे या भाजप संबंधित आरोपींनी त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून पसार झाले.
आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी या घटनेशी संबंधित अनेक पुरावेही गोळा केले. पोलिसांनी कुंदन सिंग यांच्या घरातून कपड्यांच्या ढिगाऱ्यातून रक्ताने माखलेली चादर आणि काही कपडे जप्त केले. पोलिस तपास आणि शवविच्छेदनात बलात्काराची पुष्टी झाली आहे. जास्त रक्तस्त्राव आणि न्यूरो इजा झाल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला हे देखील स्पष्ट झालं आहे.सध्या पोलिसांनी या प्रकरणातील तीन पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर गावातील लोक आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. बिरोपूर चौकात लोकांनी रास्ता रोको करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर भाजप विरोधात संतापाची लाट पसरल्याची माहिती समोर येत आहे.

