तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी मो. 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात फेरफटका मारावे लागते व एका कामासाठी अनेक अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागत असल्याने कामात विलंब होतो व काही लोकांना शासकीय कामाची माहीती व शासकीय विविध योजनांची माहीती नसल्याने दलालाकडुन फसवणूक सुध्दा होते हे टाळून सर्व अधिकाऱ्यांना एकाच टेबलवर आणून कामे तात्काल निकाली काढण्याच्या हेतुने वारसाची नोंद घेने, हीस्से वाटनी, फेरफार नोंद घेने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनां, राशन कार्ड, कृषी व पशु तसेच पंचायत समीती आरोग्य व महीला बाल कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहीती तसेच अर्ज स्वीकारने अशी अनेक कामे करण्यात आली व नोकारी खु. नोकारी बु. बाम्बेझरी व मानोली, जामनी, बैलमपुर येथील लोकांनी याचा लाभ घेतला.
यावेळी श्री. गांगुर्डे नायब तहसीलदार राजुरा, श्री. साळवे मंडळ अधिकारी विरुर, श्री. वडस्कर तलाठी साझा ईसापुर, श्री. गेडाम अन्न पुरवठा विभाग, सौ. मोते वैद्यकीय अधिकारी देवाळा, कृषी अधिकारी, सौ. मनिषा पेंदोर सरपंच नोकारी खु, श्री. वामन तुरानकर उपसरपंच नोकारी खु, श्री. वासेकर ग्रामसेवक नोकारी खु, शीवमुर्ती गायलाड ग्रा.प सदस्य, लताताई ऊईके, ग्रा.प सदस्य, ममता नागोसे ग्रा.प सदस्य, सीमा गाऊत्रे, संजय कन्नाके ग्रा.पसदस्य, राकेश भगत पो.पाटील नोकारी बु. रमेश नैताम, साधना नागोसे पो.पाटील बाम्बेझरी, साधनाताई बतकी आंगनवाडी सेविका, भगतताई आंगणवाडी सेविका, बोरूलेताई आंगणवाडी सेविका, सिंधुताई हजारे आंगणवाडी मदतणीस हे ऊपस्थित होते.

