श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अंबाजोगाई – येथून आडसकडे जाणाऱ्या रोडवर कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात झाला या भीषण अपघातात अंबाजोगाई येथील डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे वय 39 वर्ष आणि डॉ. रवी संतोष सातपुते वय 38 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दिनांक 9 जून ला दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मृतक डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते. ते आडस येथील एका आरोग्य शिबिराला भेट देऊन ते MH 44 S 3983 या कारने अंबाजोगाईकडे निघाले होते. आडस ते चनई रोडवर उतारावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेच्या झाडाला धडकली. या अपघातात दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला. दोन उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे अंबाजोगाईत हळहळ व्यक्त होत आहे.

