सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- दिल्ली सरकारला कोणतेच लोकहिताचे काम करु द्यायचे नाही याकरीता भारतीय जनता पार्टीने न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करुन “अध्यादेश” काढत दिल्ली सरकारला विकास करण्यापासून रोखण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संपुर्ण राज्यात आज नरेंद्र मोदी यांच्या दडपशाहीचा आम आदमी पार्टी कडुन निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी जिल्हा वाशिम कडुन स्थानिक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाशिम येथे निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आम आदमी पार्टी जिल्हा वाशिमचे ॲड. गजानन मोरे, राम पाटील डोरले, सुनिल जाधव, तुळशीराम कांबळे, श्याम, दिपक कांबळे यांचेसह अनेक कार्यकर्ते निषेध कार्यक्रमात सहभागी झाले होते. दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणार्या केंद्रातील भाजप सरकारच्या “अध्यादेशा” विरोधात रविवार दि. ११ जून, २०२३ रोजी राज्यात सर्वत्र निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मागील अनेक वर्षांपासून भाजपा कुठले ना कुठले कारण पुढे करुन विकास कामात अडथळे आणत आहे. जनहिताची कामे यामुळे प्रभावीत होत असुन अध्यादेश हा एक प्रकारे आम आदमी पक्षावर अंकुश आवण्याचा प्रकार आहे. आप ची वाढती लोकप्रियता येणा-या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपा साठी धोक्याची घंटा मानल्या जात असल्याने भाजपा कडून आप ला रोखण्यासाठी कायदा डावलून हुकुमशाहीचा वापर करत असल्याचा आरोप आप ने केला आहे. भाजपाने अध्यादेश मागे घेऊन दिल्ली सरकार करत असलेल्या विकास कामात अडथळा आणू नये यासाठी वाशिम आप कडुन ॲड. गजानन मोरे, राम पाटील डोरले, सुनील जाधव, तुळशीराम कांबळे, श्याम, दिपक कांबळे घोषणा देत निषेध करण्यात आला.

