हिंगणघाट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरुला तात्काळ अटक करून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात ठाणेदार मार्फत पोलीस अधीक्षक यांना निवेदन.
अमरावती येथील सौरभ पिंपळकर या माथेफिरुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांना टिव्टरवरून जीवे मारण्याची धमकी दिली असून तो टिव्टरवर म्हणतो की,’ मी तुमचा दाभोळकर करेल,’ असे ट्वीट करत ही धमकी देण्यात आली. अशा माथेफिरू तरुणाला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध करीत करून माथेफिरू सौरभ पिपळकर याला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा. जर या माथेफिरू इसमाला अटक व गुन्हा दाखल झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र आंदोलन करेल व जे पुढे काही प्रतिसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन व प्रशासनाची राहील असे निवेदन ठाणेदार यांना दिले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, विभागीय अध्यक्षा डॉ.सुरेखा देशमुख, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, सिमा तिवारी, सुजाता जांभुलकर, अर्चना नांदूरकर, किशोर चांभारे, नावेद भाई, प्रशांत एकोणकर, मारोती महाकाळकर, पप्पू आष्टीकर, नितेश नवरखेडे, अनिल भुते, गजू महाकाळकर, अरविंद ठाकरे, राहुल जाधव, सुशील घोडे, पंकज भट्ट, गोलू भुते, विपुल वाढई, रवीकिरण कुटे, निखिल ठाकरे, मनीष मुडे, वैभव भुते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ..

