अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मोबा नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- 12 जुन 2023 इयत्ता 10 वी. 12 वी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून वर्धा जिल्ह्याचे प्रसिद्ध प्राचार्य नितेश कराळे गुरुजी यांचा कार्यक्रम रविवार 11 जून रोजी सावनेर येथील प्रसंग सेलिब्रेशन हॉल येथे शालेय व महाविद्यालयीन मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
नितेश कराळे यांनी आपल्या भाषणात सामाजिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक जोरदार भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकार म्हणते की, एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहीम केंद्र सरकार राबवत आहे आणि दुसरीकडे या देशातील सुवर्णपदक विजेत्या मुलींवर अन्याय होत आहे. देशाच्या संसदेचे उद्घाटन होत आहे, परंतु देशाच्या घटनात्मक प्रमुखाच्या राष्ट्रपतीला बोलावले जात नाही, अग्निवीर भरतीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे, विद्यार्थी हे या देशाचे भविष्य आहेत, विद्यार्थ्यांनी युपीएससी, आयपीसी, एमपीएससी, या तीन क्षेत्रात जावे, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. भविष्य बदलू शकते. असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मंगला मोहकासे, डॉ.दुर्गेश वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व प्रथम लेखक नरेंद्र महुरताळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते किरण जैस्वाल, हितेश बनसोड, सावनेर परिसरातील तन, मन, धनाने निस्वार्थीपणे काम करणारे मनोहर घोळसे, दिलीप घोरमारे, राहुल सावजी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ समाजसेवक विनोद मानकर, छत्रपती लांबट, संजय राऊत, गणेश रेवतकर, ईश्वर गजभिये, गजानन चौधरी, अतुल श्रीखंडे, नाना बांगरकर, अतुल निकोसे, डॉ.युवराज मेश्राम, बंडूभाऊ चौरागडे, शेखर वासनिक आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संजय टेंभेकर व जामुवंत वारकरी यांनी केले होते, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शुभम बागडे, दिनेश मच्छले, अन्सार शेख, निशिमुल्ला सिद्धीकी, कालिदास मधुलिया, मदन मोरे, शाहीन यांनी परिश्रम घेतले. शेख, प्रकाश धोबडे, अनामिका ढिमोळे, वसुंधरा सुरजुसे, या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.


प्रचंड प्रतिभावान व्यक्तीमत्व म्हणजे कराळे सर . जयभीम सर🙏🏻