प्रशांत जगताप संपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वर्धा:- शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. सर्व शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करत आहे. पण वर्धा जिल्हात बनावट बियाण्यांची फॅक्टरीचा पोलिसांनी स्पर्दाफास केल्याची खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे नकली बियाणे अजून किती शेतकऱ्याचे जीव घेणार यांची शंका निर्माण झाली आहे.
वर्धा शहरा लगत असलेल्या म्हसाळा या गावात बनावट बियाण्यांची फॅक्टरीच आढळून आल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. वर्धा पोलिसांनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास धाड टाकली तेव्हा या बनावटी कंपनीत नामांकित बियाणे कंपन्यांचे कपाशी वाण म्हणून साधी सरकी पाकिटात भरण्याचे काम काही मजूर करीत असल्याचे दिसून आले. त्यावेळी राहुल जयस्वाल हा मुख्य आरोपी हा या बनावटी कंपनीत हजर होता. त्याला लगेच ताब्यात घेऊन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
वर्धा पोलिसांनी या बनावट बियाण्यांची फॅक्टरीच उजागर केल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन हे पण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आणखी पोलीस कुमक मागवली. त्यानंतर सातही आरोपींची त्याच ठिकाणी विचारपूस सुरू झाली. बनावट बियाण्यांची मोठ्या प्रमाणात पोती दिसून आली. त्याची मोजदाद सुरू आहे.
कृषी अधीक्षक शिवणकर म्हणाले की, हा प्रकार केव्हापासून सुरू आहे, कोणत्या गावात विकल्या गेला, किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली हे पोलिसांच्या चौकशीतच स्पष्ट होईल.किमान दोन ते अडीच कोटी रुपये किमतीचे बियाणे घटनास्थळी सापडले. तसेच दहा कोटी रुपयांवर उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरालगत बनावट बियाणे तयार करणारा हा कारखाना सुरू करण्याची हिम्मत कशी होते, याची चर्चा सुरू असून आरोपीचे राजकीय वर्तुळात लागेबांधे तपासल्या जाण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

