वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष प्रतिभाताई संदीप कांबळे यांच्या प्रयत्नातून एच वी देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी यांच्या सौजन्याने सम्राट अशोक नगर येथे सिद्धार्थ बुद्ध विहार कलवड जवळील भागात दिनांक १२ जून रोजी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. वंचित बहुजन आघाडीच्या या उपक्रमाचे समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा अनिताताई चव्हाण, संघटक आशाताई प्रभाकर पठारे शाखा अध्यक्षा अस्मिताताई सचिन कांबळे, शाखा संघटक कल्पना ताई गायकवाड, प्रभाग अध्यक्ष संदिप भाऊ कांबळे, महासचिव राकेश भाऊ गायमुक्ते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

