तालुका कृषी केंद्र संघटनेचा वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी मोबा.नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी म्हणून उत्तमरीत्या कारभार सांभाळलेले मंगेश पवार यांची नंदुरबार जिल्ह्यात नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यानिमित्याने कृषी केंद्र संघटनेकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तालुका कृषी केंद्र संघटनेचे अध्यक्ष भारत झाडे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
मंगेश पवार यांनी गोंडपिपरी तालुक्यात सलग चार वर्ष सेवा दिली. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक शेतकरी घडले. प्रगत आणि आधुनिक शेतीचा मंत्र त्यांनी येथील शेतकऱ्यांना दिला. याचाच परिपाक म्हणून या भागातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट शेती बद्दल त्यांना शासनाने वेळोवेळी सन्मानित केले. पीकस्पर्धेत सुद्धा येथील शेतकऱ्यांनी किर्ती मिळविली. तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांनी कोसा पिकाच्या उगवनीसाठी प्रोत्साहित केले. आज त्याचा फायदा दिसत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्त्रोत वाढीसाठी त्यांना बळ मिळाले आहे.
याव्यतिरिक्त मंगेश पवार यांनी आपल्या कार्य काळात बेकायदेशीर बिजाईच्या खरेदीविक्रीवर नियंत्रण ठेवले. मोठमोठ्या चुकीच्या प्रकाराचा त्यांनी भांडाफोड केला. शेतकऱ्यांना त्यांच्या योजनेचा लाभ सुलभ पद्धतीने व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न राहिला. शासनाच्या पिकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांची धडपड राहिली. या परिस्थितीत अचानक येथील तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांचे स्थलांतरण झाल्यामुळे त्यांना कृषी केंद्र चालक-मालक संघटना आणि व्यापारी मंडळाकडून निरोप देण्यात आला. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधीकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या आणि प्रतिनीधी बनाण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

