पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी भागात वास्तव्यास असणारे राजकीय पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष यांचे भावाला आरोपीत सोन्या शेलार याने फोनवरून धमकी दिलेबाबत वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाहिजे फरारी, तडीपार आरोपी शोध घेवून प्रभावी कारवाई करण्याकरीता वरिष्ठांनी तसे आदेश दिले होते.
त्या अनुशंगाने दि. १४/०६/२०२३ रोजी तपास पथकाचे प्रभारी पोलीस अधिकारी पोउपनि संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वानवडी पोलीस ठाणेकडील तडीपार गुन्हेगार श्रीधर ऊर्फ सोन्या विठ्ठल शेलार, वय-३५ वर्षे, रा. शांतीनगर, स.नं. ५४ / ९ब, वानवडी, पुणे हा शिंदे छत्री नुराणी कब्रस्थानकडे जाणारे रोडवर वानवडी, पुणे या परिसरात दारूच्या नशेत धारदार हत्याराराह फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदार यांचेकडुन मिळाली. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी यांचे आदेशाप्रमाणे सापळा रचून श्रीधर ऊर्फ सोन्या यास ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.
सदर तडीपार आरोपीस मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५ यांचे कार्यालय जावक क्रमांक ४५५२/२०१६ व तडीपार आदेश क्र.१७/२०२१ दि.०९/०७/२०२१ मुंबई पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून ०२ वर्षाकरीता तडीपार असतानाही पुणे शहरात येण्यासाठी कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीररित्या पुण्यात आला होता. त्याप्रमाणे वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७७/२०२३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश गाढवे, तपास पथक, वानवडी पो.स्टे. हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त, परि. ५. पुणे, श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्री. साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक, भाऊसाहेब पटारे, तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक, संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार, महेश गाढवे, अतुल गायकवाड, हरिदास कदम, विठ्ठल चोरमले राहुल गोसावी, अमोल गायकवाड, निळकंठ राठोड यांनी केली आहे.

