Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट येथे पुन्हा वाळू माफियांवर अनेक स्थिकानी धाडी, 684 ब्रास अवैध रेतीसाठा प्रशासनाने केला जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 16, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे पुन्हा वाळू माफियांवर अनेक स्थिकानी धाडी, 684 ब्रास अवैध रेतीसाठा प्रशासनाने केला जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वाळू तस्करीसाठी वर्धा नागरी पतसंस्थेचा जमिनीचा वापर, बँक ला प्रशासनाने दिला नोटीस.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- जिल्हात मागील काही दिवसांपासून वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. या वाळू तस्करांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात नदीतून अवैधरित्या वाळू काढून साठवणून करून ते चढ्या दराने विक्री करून मोठ्या प्रमाणात माया जमवली आहे. पण जिल्हा प्रशासनाने वाळू साठेबाज माफियांवर जोरदार कारवाई करत लाखो रुपयांचा वाळू साठा जप्त केला आहे.

अवैधपणे साठवणूक केलेल्या रेतीवर कारवाई करुन साठा जप्त करण्याचे आदेश वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जील्हातील सर्व तहसिलदारांना दिले आहे. त्याप्रमाणे ठिकठिकाणी अवैध रेतीवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. हिंगणघाट येथे पुन्हा ठिकठिकाणी धाडी टाकून तब्बल 684 ब्रास इतका रेतीसाठा पुन्हा जप्त करण्यात आला. हिंगणघाट तहलिसदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हिंगणघाट शहरातील आमदार यांच्या घराशेजारी मोहता मील परिसरातील कारवाईनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ठिकठिकाणी अवैध रेतीसाठ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे अवैध रेती साठ्यावर ही कारवाई केली जात आहे. हिंगणघाट येथे पहिल्या कारवाईत 200 ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या परिसरात जमा करण्यात आला आहे. नव्याने ठिकठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल 684 ब्रास इतका रेतीसाठा आढळून आला आहे. धाडीची ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, नायब तहसिलदार सागर कांबळे, मंडळ अधिकारी डी.आय. हेमणे, विलास राऊत, संजय नासरे, तलाठी सतिश झारे, रामकृष्ण घवघवे, गजानन ठाकरे, श्रीकांत राऊत, कोमल ढोबळे यांनी केली.

पथकाने केलेल्या कारवाईत डंकीन, कवडघाट या परिसरातून 160 ब्रास रेती जप्त करुन ती हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली. मौजा हडस्ती येथे देखील 230 ब्रास, मौजा धोच्ची येथे 30 ब्रास, मौजा साती येथे 45 ब्रास, शेकापूर मोझरी येथे 20 ब्रास, पेाहणा येथील सुतगिरणी येथे 40 ब्रास, कापसी व नांद्रा येथे प्रत्येकी 12 ब्रास, कवडघाट येथे वर्धा नागरी सहकारी पतसंस्था मर्या हिंगणघाटच्या परिसरात 135 ब्रास अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला. अवैध रेतीसाठा प्रकरणी या बँकेस नोटीस बजावण्यात आली आहे. हा सर्व साठा जप्त करुन तहसिल प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतला आहे. ही रेती शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंगणघाट येथे अवैध रेतीसाठ्यावर सलग दुसरी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अवैध रेतीसाठ्याची माहिती द्या: राहुल कर्डिले जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीसाठा आढळून आला आहे. अन्य ठिकाणी देखील असा साठा असण्याची शक्यता आहे. तहसिलदारांना या साठ्यांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांना असा साठा आढळून आल्यास त्यांनी 83297 50342 या व्हाट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Previous Post

14 जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जीवनदात्यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न, रुग्णसेवक उमेश इंगळे सन्मानित.

Next Post

बीड मध्ये दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना, दोन जण जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड मध्ये दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना, दोन जण जखमी.

बीड मध्ये दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना, दोन जण जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In