Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रावेत सेंटोसा वॉटर पार्क मध्ये सहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, मालक मॅनेजर व सुपरवायझर वर गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 17, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रावेत सेंटोसा वॉटर पार्क मध्ये सहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, मालक मॅनेजर व सुपरवायझर वर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी ता:१५:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे एका सहा वर्षे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रावेत हद्दीतील सेंटोसा वॉटर पार्क मध्ये सोमवारी (ता. १२)रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी बेजबाबदार वाॅटरपार्क मालक, मॅनेजर आणि सुपरवायझर यांचे विरुद्ध रावेत पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस वॉटर पार्क मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

पाच वर्षापूर्वी देखील अशा प्रकारची घटना या वाटर पार्क मध्ये घडली होती. मॅनेजर १) अजय हरिलाल हिंदुजा रा. शिवम सोसायटी फ्लॅट नंबर १०२,पिंपळे सौदागर २) राहुल आबा मोरे रा. तुळजाभवानी हौसिंग सोसायटी फ्लॅट नं.बी ७०१ महस्के वस्ती रावेत सुपरवायझर ३) सागर भगवान काळे ,रा.शेळके वस्ती दत्त मंदिराजवळ, ता.हवेली जि.पुणे )अशी गुन्हा नोंद झालेले यांची नावे आहेत, तर शाहिरा याकुब मुल्ला वय ६ वर्ष रा.सोनिगिरा विहार सोसायटी काळेवाडी अशी मृत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

याप्रकरणी रावेत पोलीस ठाणे हवालदार राकेश शांताराम पालांडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेंटोसा वाटर पार्क येथे सोमवारी दुपारी सहा वर्षाच्या शाहिरा तिच्या आई आणि दोन भावासोबत पिकनिक साठी आली होती. मुले पाण्यामध्ये खेळत होती दरम्यान मुलांना खाऊ आणण्यासाठी शहीराचे आई तिला शोधू लागली ,मात्र आईला शाहिरा दिसली नाही .आईने तिच्या दोन भावांना विचारले असता त्यांनी शाहीरा पाहिली नसल्याचे आईला सांगितले घाबरलेल्या आईने शोधाशोध केली असता शाहिरा ही छोटे स्लाईडिंघ पुलाच्या बाजूला असलेल्या स्विमिंग पूल मध्ये पाण्यात बुडून मृत झाली असल्याची आढळून आली.

सेटोंसा वॉटर पार्क मध्ये मुलांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा अधोरे लिखित झाले आहे. पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका मुलाचा वॉटर पार्क मध्ये बुडून मृत्यू झाला होता. वॉटर पार्क मध्ये एन्ट्री फी च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली जाते. खाद्यपदार्थ दुप्पट ते तिपटीच्या भावाने विक्री केले जातात. घरगुती कोणत्याही खाद्यपदार्थाला आत मध्ये प्रवेश नाही. आत मध्ये मुलांच्या बाबतीत कोणतीही सुरक्षित जबाबदारी घेतली जात नाही. मुलाच्या अंगात काही जॅकेट दिले जात नाही. ज्या ठिकाणी पाण्याची खोली जास्त आहे अशा ठिकाणी कोणतेही मार्गदर्शक सूचनाफलक नाहीत. अनेक ठिकाणी सुरक्षा दिली नाहीत सुरक्षारक्षक (लाईफ गार्ड) जागेवर उपलब्ध नसतात. त्यामुळे हा वॉटर पार्क लहान मुलांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा ठरत असल्याची चर्चा सूरु आहे.

अशा स्वरूपाच्या बहुतांश घटनांमध्ये मालक हा नामनिराळा असल्याचे भासविलेजाते .त्याचा या प्रकारांशी काही संबंध नाही असे सांगत त्याला बगल दिली जाते .परंतु रावेत पोलिसांनी या मालकाविरुद्ध देखील गुन्हा नोंद केला आहे या वॉटर पार्क मध्ये चार जणांची भागीदारी असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे .सध्या हे भागीदार पोलिसाच्या हाती लागलेली नाहीत.रावेत पोलीस त्यांचा कसूर शोध घेत आहे.

आपल्या मुलगा वॉटर पार्क मध्ये खेळत असताना पालकांनी स्वतः जातीने त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे सध्या वातावरणातील वाढत्या उष्मांक मुळे मुलांना पाण्याच्या आकर्षण अधिक आहे. एन्जॉय म्हणून स्विमिंग पूल तसेच वॉटर पार्क मध्ये पालक आणि मुलांची गर्दीत प्रवेश मिळते, दुसऱ्यांच्या भरोशावर मुले सोडण्यापेक्षा आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Previous Post

नागपुर गरिबावर कारवाई करणारे वीज महावितण बनले श्रीमंताच्या ताटा खालचे मांजर? नागरिकांचा संताप.

Next Post

बीड येथील व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली पालकमंत्री अतुल सावे यांची भेट, विविध विषयावर चर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड येथील व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली पालकमंत्री अतुल सावे यांची भेट, विविध विषयावर चर्चा.

बीड येथील व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली पालकमंत्री अतुल सावे यांची भेट, विविध विषयावर चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In