श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आषाढी वारी निमित्त पंढरपूर कड़े निघालेल्या वारकऱ्यांना वाणगाव फाटा येथे नेकपुर पोलीस स्टेशनच्या वतीने दूध वाटप करण्यात आले. यावेळी नेकपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख मुस्तफा, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, अजय पानपाटील, पो. हे कॉ सचिन डिडूळ, गोविंद राखखाडे, खांडेकर, डोंगरे, सह सर्व पोलीस कर्मचारी यावेळी स्वतः वारकऱ्यांना दुध वाटप करत होते.
संत मुक्ताबाईच्या या पालखी सोबत पोलीस दोन दिवसापासुन असुन या भक्तीमय वातारणामुळे पोलीसांना पण एक वेगळाच आनंद मिळतो आहे. नेहमी धकाधकीत असलेल्या पोलीसांना या दिंडीमुळे वारीच्या सोहळ्याचा आनंद उपभोगता आला.

