Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

नागपूरात गाडीचा दरवाजा नाही उघडल्याने तीन चिमुकल्याचा कार मध्ये तडफडून मृत्यु, संपूर्ण नागपुरात हळहळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 21, 2023
in अपघात, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूरात गाडीचा दरवाजा नाही उघडल्याने तीन चिमुकल्याचा कार मध्ये तडफडून मृत्यु, संपूर्ण नागपुरात हळहळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपुर शहरातून एक काळीज हेलावणारी घटना पाचपावली पोलिस स्टेशनचा हद्दीतील फारुख नगरमधून मधून समोर आली आहे. येथे शनिवारी तिने मुले बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यात दोन लहान मुली व एका मुलगा होता पण परिसरातील एका चार चाकी गाडीत त्यांचे मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे.

फारुख नगर परिसरात एक नादुरुस्त चार चाकी कार उभी होती. त्यावेळी खेळता खेळता ही तीन मुलं गाडीच्या आत मध्ये गेले. पण या कारचा दरवाजा लॉक होत नसल्यामुळे व केवळ बाहेरूनच उघडल्या जात असल्याने कारच्या आत बंद झालेल्या तीन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. मृत्यूपूर्वी तीनही चिमुकल्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी धडपड केली होती. कारच्या आत मिळालेल्या मुलांच्या बोटांच्या ठशांवरून ही बाब उजेडात आली आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी सायंकाळी ६:३० वाजता पाचपावली ठाण्यांतर्गत फारूखनगरमध्ये आलिया फिरोज खान वय 6 वर्ष, तिचा भाऊ तौसिफ फिरोज खान वय 4 वर्ष आणि आफरीन इरशाद खान वय 6 वर्ष यांचे मृतदेह कारमध्ये आढळले होते. तिघेही 17 जूनला दुपारपासून बेपत्ता होते. ते बेपत्ता झाल्याचे समजताच 17 जूनला सायंकाळी सात वाजता कुटुंबीयांनी पाचपावली ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस आणि कुटुंबीय मुलांचा शोध घेत होते.

शहरात ठिकठिकाणी शोध घेतल्यानंतर मुलांचा काहीच पत्ता न लागल्याने पोलिसांनी बारकाईने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. यात मुले परिसरातून बाहेर गेली नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळी सहा वाजता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकाऱ्यांसह जवळपास 500 पोलिसांना घटनास्थळ परिसरात शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी फारूखनगरच्या कोनाकोपऱ्याची पाहणी केली. श्वान पथकाला बोलावले. अर्ध्या तासात पोलिसांना मुलांच्या घरापासून काही पावलांवर असलेल्या कारमध्ये त्यांचे मृतदेह आढळले.

Previous Post

आमच्या गावाला वाचवा हो, अशी पुकार घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या शेकडो महिला.

Next Post

जळगाव: पोलिसांनी हात दाखवला अन्‌ झाला घात; ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जळगाव: पोलिसांनी हात दाखवला अन्‌ झाला घात; ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

जळगाव: पोलिसांनी हात दाखवला अन्‌ झाला घात; ट्रकवर आदळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In