ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील धरणगाव तालुक्यातून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे.पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या वाहतूक पोलिसाने ट्रकला हात दाखवला त्यामुळे सुसाट आयशर ट्रक जागच्या जागी थांबला. भर रस्त्यात गतीने चालणारा ट्रक थांबल्याने ट्रकमागून येणारा दुचाकीस्वार त्या ट्रकवर जाऊन भिडला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संदीप गोरख देसले वय 35 वर्ष, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संदीप देसले रा. कुसुंबा, ता. जळगाव येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. लक्झरीवर चालक म्हणून तो काम करीत होता. नेहमीप्रमाणे त्याने सुरत ते जळगाव बस घेऊन आला. कासोदा येथे प्रवाशांना सोडले. नंतर कासोदा येथून संदीप दुचाकीवरून जळगावकडे येण्यासाठी निघाला होता.राष्ट्रीय महामार्गावर सकाळी पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांनी धरणगांकडून जळगावकडे येणारी आयशरला हात दिला. त्यामुळे आयशर ट्रक जागीच थांबला. तेवढ्यात संदीप देसले दुचाकीने येत असताना मागून जोरदार धडक दिली. यात संदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई अरुणाबाई, वडील गोरख देसले, भाऊ दीपक, पत्नी सोनाली आणि ज्ञानेश्वरी व दर्पण हे दोन मुले असा परिवार आहे.

