श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आतंरराष्टरीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर सर्वात जास्त पडतो, त्यामुळे या दिवसाला वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणतात. भारतीय संस्कृतीनुसार, या दिवशी योगाचा नियंत्रित अभ्यास व्यक्तीला दीर्घायुष्य प्रदान करतो. त्यामुळेच हा दिवस योग दिन म्हणून निवडण्यात आला आहे. दरवर्षी योग दिनाच्या दिवशी एक नवीन थीम ठरवली जाते. या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये योगाची थीम वसुधैव कुटुंबकम अशी ठेवण्यात आली आहे. यानिमित्ताने आदित्य कृषी, कृषी अभियांत्रिकी,कृषी जैवतंत्रज्ञान व अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आदित्य कॅम्पस येथे सकाळी 7 ते 8 दरम्यान योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
आदित्य शिक्षण संस्था बीड च्या संचालिका डॉ. ए. एस. सारडा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आलाहोता.आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुकाराम तांबे , आदित्य जैवतंत्रज्ञान महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. सतीश कचरे आदित्य कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय चे प्राचार्य अमोल सानप आणि आदित्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भूतडा याची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमास उपस्थित योग शिक्षक गावंडे मॅडम यांनी मनःशांती, आरोग्य आणि आनंदासाठी योग’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले, यावेळी आदित्य चारही महाविद्यालयाच्या विद्यार्थी तसेच शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रा गुजर (कार्यक्रम अधिकारी, अन्न तंत्र महाविद्यालय), प्रा. चव्हाण (कार्यक्रम अधिकारी, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय) प्रा.राठोड (कार्यक्रम अधिकारी, कृषी महाविद्यालय) आणि प्रा. उबाळे (कार्यक्रम अधिकारी , कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय) व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले.सदरील कार्यक्रम चे सूत्रसंचालन प्रा ढोबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. गर्जे यांनी केले.

