पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका महिला प्राध्यापिकेला विद्यार्थ्याने व्हिडिओ कॉल करुन दमदाटी करत अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. यानंतर याचे रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजार अमेरिकन डॉलरची खंडणी मागण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी एका प्रख्यात मानद विद्यापीठातील प्राध्यापिकेने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मयांक सिंग वय 26 वर्ष,रा.पटणा, बिहार, सध्या पुणे याच्याविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत महिला प्राध्यापिकेचा आरोपी हा विद्याथी आहे. तो मयंक सिंग या इंन्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या संपर्कात नेहमी असायचा. यानंतर तो मोबाईल आणि व्हॉटसअप कॉलवरुन त्यांच्या संपर्कात राहू लागला.
यानंतर त्याने एकदा पिडीत महिला प्राध्यापिकाला व्हिडीओ कॉल करुन” मी सांगतो तसे केले नाही तर , मी तुमची आपल्या विद्यापीठात बदनामी करेल’ असा दम भरला. यानंतर पिडीतेला अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडून त्याचे रेकॉर्डींग केले. यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या एका आयडीवरुन पिडीता आणी तीच्या पतीला पाठवण्यात आला. हा व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी देत पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले करत आहेत.

