प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात एका 15 वर्षीय मुलीचा बाल विवाह झाल्याची खळबळजनक खुलासा समोर आला आहे. त्यात ही अल्पवयीन मुलगी 2 महिन्याची गर्भवती राहिल्याने या बाल विवाहाचे बिंग फुटले. त्यामुळे संपूर्ण जिल्हात या बाल विवाहमुळे खळबळ उडाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथील एका पंधरा वर्षीय मुलीचे सूत तिच्या नातलगाच्या शेजारील व्यक्तींशी जुळले. त्याची कुणकुण लागताच मुलीने आईला खरे ते सांगितले. आईने मग त्या तिच्या वयाचा विचार न करता, आणि अल्पवयीन मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे तरीही तिने त्या मुलाबरोबर आपल्या मुलीचा विवाहच लावून दिला.
विवाह झाल्यानंतर काही महिन्यांनी त्या अल्पवयीन नवविवाहितेची प्रकृती बिघडल्याने तिला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी कुटुंबातील नातलग घेवून गेले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासात ती अल्पवयीन नवविवाहिता दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना अवगत केले.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मुलगी अल्पवयीन असूनही तिचा बालविवाह लावून दिला म्हणून तिच्या घरच्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका ठेवून तिघांविरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. पोक्सो शाखेच्या अनुराधा फुकट पुढील तपास करीत आहे.

