रविंद्र भदर्गे, परतुर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर तालुक्यातील परतूर – सेलू रोडवरील मापेगाव बू (पुनर्वसन) गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम चालू असून सदरील कामासाठी 2021 साली ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रा. प ठराव घेऊन जागा निश्चित करुन दिली होती. जागा निश्चित असताना देखील नियोजनाअभावी मारोती मंदीर परिसर पुनर्वसन विभागाने राखीव ठेवलेल्या गावठाण, खळवाडी व गुरुचरनासाठी राखीव असलेल्या जागेत सदरील बांधकाम नियम बाह्य चालू असल्याचा आरोप भरत मोगरे, राहुल देशमाने यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेनाद्वारे केला आहे.
मापेगाव बू (पुनर्वसन) गावात गावठाण, गुरुचरण व खळवाडी यासाठी राखीव असलेली जागा बदलून तातडीने पुनर्वसन विभागाने दिलेल्या एन.ओ.सी, प्रमाणे बांधकाम करण्यात यावे, तत्काळ कामाची चोकशी करून, मनमानी कारभार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाही करण्यात यावी या मागणीसह दिनांक 26 जुन 2023 पासून बेमुदत उपोषन करण्यात येत आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले की प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या मंजुरी मिळाल्यावर तीन वर्षापूर्वीच याबाबत ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन सदरील इमारत राणीवाहेगावच्या उत्तरेस जवळपास दीड एकर खुल्या जागेच्या परिसरात बांधकाम करायचे निश्र्चित करण्यात झाले होते. याबाबत पाटबंधारे विभाग जालना व पुनर्वसन विभागाने एन.ओ.सी नाहरकत प्रमाणपत्र देखील या इमारतीच्या बांधकामासाठी दिली होती. माञ प्रत्यक्ष काम सुरू करताना भरवस्तीत श्रध्देच्या मारोती मंदीर परिसर, तसेच गुरे चारण्यासाठी, खळवाडीसाठी गावठाण जमिनीसाठी राखीव जागेत या उपकेंद्राचे काम हे नियमबाह्य चालू असून त्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांत नाराजी आहे. भरत मोगरे, राहुल देशमाने यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदणात व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत जागेवरील बांधकाम तातडीने आताच थांबवत नियोजित जागेत सदरील आरोग्य उपकेंद्राचे काम चालू करावे अशी रास्त मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. याबाबत प्रशासनान काय भूमिका घेते, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

