पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक 27/07/2023 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील पोलीस निरिक्षक सुनिल थोपटे, व स्टाफ समर्थ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अमली पदार्थ गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक साहिल शेख व पो कॉ अझीम शेख यांना बातमी मिळाली की, मुजाहिद अनवर शेख वय 25, रा गोल्डनसिटी, एस आर ए कॉलेनी, रोशन मस्जिद जवळ, भवानी पेठ पुणे हा इसम काहीतरी अमली पदार्थ विक्री करिता समर्थ पोलीस स्टेशन हद्दीमधील रोशन मस्जिद जवळ येणार आहेत. अशी मिळाले बातमी नुसार त्याबाबत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून सदर बाबत छापा कारवाई करून संशयावरून पोलीस अंमलदार यांचे मदतीने सदर इसमांला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्याचे जवळ 52 ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ 10,40,000किंमत रुपये व 10000कीं रु चा एक मोबाईल असा एकूण अमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर/- ऐवज मिळून आल्याने तो जप्त करून त्याचे विरुद्ध समर्थ पोलीस ठाणे येथे N.D.P.S.Act ८(क) 22(क ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त सो गुन्हे श्री रामनाथ पोकळे ,मा पो उप आयुक्त सो गुन्हे श्री अमोल झेंडे, मा सहा पो आयुक्त गुन्हे श्री सतीश गोवेकर , यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी पो नि सुनील थोपटे, पो उप निरी. डी एल चव्हाण, Asi घुले,पो हवा संतोष देशपांडे , पो हवा संदीप जाधव,पो.ना. साहिल शेख,पो.अमलदार अझीम शेख, मयूर सूर्यवंशी,योगेश माढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड़ यांनी केली आहे….
सुनील थोपटे
पोलीस निरीक्षक
अमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर

