उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या वकिलांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अॅड. अनिरूध्द कांबळे, अॅड. राहूल कट्टी, अॅड. महेश कांबळे, अॅड. ममतेश आवळे, अॅड. राहुलराज कांबळे, अॅड. सतिश कांबळे, अॅड. कालिदास कांबळे, अॅड. अमित मिठारे, अॅड. किशोर मराठे आदी वकील बांधवांनी उपस्थित लावली होती. या सर्व वकील बांधवांचा सत्कार समाजाच्यावतीने करण्यात आला. यावेळी हल्लाबोल मोर्चा आंदोलनात अटक झालेल्या भिमसैनिकांचा व जामिनदारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांची मनोगतानंतर अॅड. अनिरूध्द कांबळे, अॅड. ममतेश आवळे, अॅड. राहुल कट्टी यांनी उपस्थित भिमसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी वकील बांधवांनी आंदोलनात जखमी झालेल्या बांधवांना आर्थिक मदत दिली. समाजबांधवांना नवी चेतना देण्याचे काम वकील बांधवांच्या माध्यमातून झाल्याचे उपस्थित भिमसैनिकांनी व्यक्त केले.

