पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
पिंपरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २७/०६/२०२३ रोजी पिंपरी पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी आम्ही स्वतः तसेच सोबत पोलीस उप निरीक्षक शाकीर जिनेडी, सहा. पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर, पोलीस हवालदार ६८४ हाडे, पोलीस हवालदार ९७९ बेदरकर, पोहवा. ११८५ बारशिंगे, पोलीस नाईक १७६२ करपे, पो.ना. १७६१ महाडिक, पो.ना. १२२२ बागसिराज, पो.ना. १८८० मुजावर, पोलीस शिपाई २९४८ शेख पोशि २७२२ जानराव, पोलीस नाईक १९१७ बंड, पो.शि. २६८३ ढोकले, पो.शि. २३५५ वाघमारे, पो.शि.निल द पो.शि. बजबळकर असे पिंपरी पोलीस स्टेशन हदित दुपारी १४/५० वाजता रवाना झालो होतो. आम्ही रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी चेक करीत असताना दुपारी १५/२० वाजताचे सुमारास केसएसबी चौकाकडुन पिंपरी मोरवाडी कोर्टाकडे जाणारे रोडवर जुन्या मोरवाडी पिंपरी कोर्टाचे अलीकडे ५० मीटर अंतरावर आलो असताना, दोन मोटार सायकलवर तीन इसम बसुन जात होते. परंतु त्यांचे मोटार सायकलला नंबर प्लेट नसल्याने आम्हाला त्यांचा संशय आला तेव्हा आम्ही त्यांचा पाठलाग केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना, आमचेमधील काही गाडया त्याचे समोर आडव्या लावून त्यांना जागीच पकडले व त्यांना त्यांची नाव पत्ते विचारले असता, होंडा सीबी शाईन मोटार सायकल वरील इसमाने त्याचे नावे १) आदित्य अनिल देशमुख वय २३ वर्ष रा. सुरमापुरी, ता. आंबड, जि. जालना असे सांगितले व हिरो होंडा स्प्लेंडरवर बसलेल्या दोघांनी त्याची नावे २) दादासाहेब ऊर्फ दादया प्रकाश पटेकर पय- १९ वर्ष, रा. मु. आडगाव, पोस्ट-निरी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर ३) सुनिल ऊर्फ गोटया सुरेश वाळेकर वय २५ वर्ष रा.मु. पिंपळगाव, पो. दौलावडगाव, ता. आष्टी जि.बीड अशी असल्याचे सांगितलेने आम्ही त्यांना गाडीचे नंबर प्लेटबाबत विचारून त्यांचेकडे गाडीची कागदपत्रे मागितली असता, सदरचे इसम हे उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. तेव्हा आम्ही त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी करण्या करीता त्यांना पोलीस ठाणे येथे आणले असता त्यांचेमधील दादासाहेबर ऊर्फ दादया प्रकाश पटेकर याने सांगितले की, त्याने व त्याचा मित्र योसेफ खंडागळे रा. बोपखेल, पुणे या दोघांनी मिळुन त्याचेकडे असलेली होंडा सीबी शाईन मोटार सायकल ही डीवाय पाटील मेन गेट जवळून, पिंपरी, पुणे येथुन व हिरो होंडा स्प्लेंटर ही लकी स्क्रॅप सेंटर समोर डीवाय पाटील कॉलेज जवळ फुलेनगर भोसरी येथुन चोरी केल्याचे सांगितले व त्याचे सोबत असलेल्या अदित्य अनिल देशमुख व सुनिल सुरेश वाळेकर यांनी त्या दोन मोटार सायकली विकत घेतल्याचे सांगितलेने १) दादासाहेब ऊर्फ दादया प्रकाश पटेकर वय १९ वर्ष, रा. मु. आडगाव पोस्ट-निरी ता.पाथर्डी, जि.अहमदनगर. २) योसेफ शमुवेल खंडागळे वय २२ वर्ष स. गणेश नगर कॉलनी न.५ शुभम अपार्टमेंट, सुदामा जीम समोर बोपखेल पुणे ३) आकाश प्रकाश पटेकर वय २३ वर्ष, रा. मु. आडगांव, पोस्ट-निरी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर ४) अदित्य अनिल देशमुख वय २३ वर्ष, रा. चुरमापुरी, ता. आंबड, जि. जालना 4) सुनिल ऊर्फ गोटया सुरेश वाळेकर वय २५ वर्ष, रा. मु.पिंपळगाव, पो. दोलावडगांव, ता. आष्टी, जि. बीड यांना पिंपरी पोलीस ठाणे गु.र.नं. ६३२ / २०२३ भादवि कलम ३७९ मध्ये अटक करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्याचेकामी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकुण ६,६०,०००/- रूपयांचा माल, त्यामध्ये १ ) एकूण ८०,०००/- रु. किं.ची ०२ दुचाकी वाहने, त्यात यातील ४०,०००/- रू. किं.ची एक होडा कंपनीची शाईन मोटर सायकल नं. एमएच १४ जीझेड ९७१५. २) एकूण ०३,१०,०००/- रू. कि.ची ०६ दुचाकी वाहने, ३) एकूण ०२७०,०००/- रु. किं.ची ०६ दुचाकी वाहने काढून दिल्याने सदरची एकुण १४ वाहने ही
निवेदन पंचनाम्याने जप्त करण्यात आलेली आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे, पोलीस सह आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, मा. श्री. विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ- १ पिंपरी चिंचवड, मा. श्री. सतीश फसले. सहायक पोलीस आयुक्त सो, पिंपरी विभाग, पिंपरी चिंचवड, श्री. राम राजमाने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक व श्रीमती रूपाली बोबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री सावडे, शाकिर जिनेडी, सपोफी प्रमोद भांडवलकर, पो.हवा. राजेद्र बारशिंगे, पो. हवा. शांताराम हांडे, वसंत बेदरकर, पो.ना, जावेद बागसिराज, गणेश करपे, सोमेश्वर महाडीक, विष्णू भारती, ओंकार बंड, जावेद मुजावर, मपोना भाग्यश्री जमदाडे, पो.शि. मोहसिन शेख, विजय जानराव, रोहित वाघमारे, विकास रेड्डी, समीर पळे, आनंद बजदळकर, सुरज ढोकले व दत्ताजी कवठेकर यांनी केली आहे.

