पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
पिंपरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २०/०६/२०२३ रोजी पिंपरी पोलीस ठाणे मधील तपास पथकाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार हे मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी किजीबल पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित करण्यात आल्याने पोलीस ठाणे हदीत पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दोन वर्षापासून मोक्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार नामे अमित भुरेलाल सौदे, वय २५ वर्षे, रा. आंबेडकर कॉलनी, रिटर रोड, पिंपरी, पुणे हा बौध्दनगर येथे त्याचे घरच्यांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस उप निरीक्षक अनिरुध्द सावर्डे यांनी लागलीच सदर बातमी बाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राम राजमाने सो, पिंपरी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांना फोनवर कळविली असता, मा. वपोनि सो यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे दोन टिम तयार करून टिम क्रं. १ हे बौध्दनगर येथील कमानी पाशी व टिम क्रं. २ ही बदनगर येथील मोकळ्या मैदानात वेगवेगळीकडे सापळा रचुन थांबले. त्यानंतर थोडया वेळाने बामती प्रमाणे अमित मुरेलाल सौदे वय २५ वर्षे, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी पुणे हा तेथे आला असता त्यास आम्ही सर्वजण ओळखत असल्याने पोलीस उप निरीक्षक सावर्डे व पोलीस उप निरीक्षक शाकीर जिनेडी यानी इशारा केला तेव्हा आम्ही सर्व स्टाफ यांनी त्यास दिनांक २७/०६/२०१३ रोजी १९:३० वा. ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता पिंपरी पोलीस ठाणे येथे आणले. सदरचा आरोपी हा पिंपरी पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि ) ८१४/२०२१ भा.दं.वि. कलम ३९७, ३४१, ५०४, ५०६, क्रिमीनल लॉ अॅमेनमेंट अॅक्ट ३ ७ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(४) २) ६८० / २०२१ भा.दं.वि. कलम ३२४, ३२३४५२ ४२७. ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५), महापोका ३७(१)(३) सह १३५, क्रि. लॉ अॅ. अँ. ३. ७ ३) ३७० / २०२१ भा. दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. य शिंदे, पोलीस सह आयुक्त सौ. पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड, मा.श्री. विवेक पाटील, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ- १ पिंपरी चिंचवड, मा. श्री. सतीश कसबे, सहायक पोलीस आयुक्त गो, पिंपरी विभाग, पिंपरी चिंचवड, श्री राम राजमाने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीमती रूपाली बोबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पिंपरी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अनिरुध्द सावर्डे, शाकिर जिनेडी, पो. हवा. राजेंद्र बारशिंगे, पो. हवा. शांताराम हाडे, पो.ना. जावेद बागसिराज, गणेश करपे, सोनेश्वर महाडीक, ओंकार बंड, पो.शि. समीर ढवळे व दत्ताजी कवठेकर यांनी केली आहे.

