युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन सावनेर:- तहसील अंतर्गत येणाऱ्या मौजा माळेगाव जोगा तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील शेत सर्वे नंबर 238 या शेतातील शेतमालक प्रीती शरद नांदुरकर व पती शरद नांदुरकर यांनी अवैधरीत्या बिना परवाना शेतातील मुरूम विक्री करण्यात आला याबद्दल ज सामाजिक संस्थेच्या व समितीच्या वतीने सावनेर येथील नायब तहसीलदार कोहळे यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटल आहे की, मौजा माळेगाव जोगा तालुका सावनेर जिल्हा नागपूर येथील 238 या शेतातील शेतमालक प्रीती शरद नांदूरकर पति शरद नांदुरकर या दोघांनी संगमत करून शेतातला असलेला अंदाजे १५० ट्रक मुरूम बिना परवाना अवैधरीत्या उत्खनन करून तो परस्पर विक्री करण्यात आली तसेच समितीच्या वतीने मोक्का चौकशी केली असता त्या ठिकाणी ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनात आले.
या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. जनकल्याण समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भगवान चांदेकर, विदर्भ संघटक युवराज मेश्राम, दशरथ साळवे, रमेश कोळमकर, विक्रम गमे, सिद्धार्थ मांडवे, मयूर नागदवे, शांताराम डोके, राहुल राऊत सह संघटनेतील अनेक पदाधिकारी यांनी हे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवल्याने त्या अधिकारी यांना पदावरून पायउतार करून त्याचावर कठोर कारवाई करण्यात यावी. शासनाचा जो महसूल बुडाला तो यांचा कडून वसूल करण्यात यावा अशी मागणी समितीने करण्यात आली. तरी या कामाची त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे मागणी करण्यात आली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

