प्रशांत जगताप, मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात मोठी खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून नवीन संसार थाटला आहे. त्यामुळे राज्यात नवीन राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी काका शरद पवार यांना मोठा धक्का देत शिंदे फडणवीस यांचा सरकार मध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खंडखोरी झाली आहे.
शिंदे फडणवीस या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी मोठा दावा केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला दावा केला आहे. आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसचा चिन्हावर आम्ही लढणार आहोत. तसेच विधिमंडळातही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांना पाठिंबा.. महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाचा अजून विस्तार होणार आहे. त्यावेळी अजून काही जणांना संधी मिळणार आहे. सध्या देशपातळीवर अन् राज्याची परिस्थिती लक्षात घेता आम्ही विकासाला महत्व दिले पाहिजे, असे मत आमच्या सर्वच सहकाऱ्यांनी मांडले. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचे निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करत आहेत. आपणही त्यास पाठिंबा दिला पाहिजे, असे मत आमचे सहकार्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गेले 24 वर्षांपासून छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल किंवा सगळ्यांनीच शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आगामी काळात तरुणांना संधी देण्याची जास्त आवश्यकता आहे. त्या संदर्भात वेगवेगळे व्हिजन आहे. त्या व्हिजननुसार नवे कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजेत. त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मी मागे अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असताना आम्ही सगळ्यांनी विकासाचा विचार करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला.

