राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- कचऱ्याचा त्रास वाचून जास्तीचे पिक येईल या आशेन बळीराजान चोरबीटी बियाण खरेदी केल.पण यंदा अनेकांच्या शेतात चोरबीटी उगवलीच नाही.यामुळ शेतकरी बांधवांत प्रचंड संताप आहे.याच संतापातून शेतकरी चोरबीटी विकणाऱ्याच्या घरी जात आमचे पैसे परत करा अन्यथा बघून घेउ असा इशारा देत आहेत.या सर्व अनपेक्षित प्रकारामुळ चोरबीटी तस्कराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
तेलंगणा सिमेला लागून असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात चोरबीटी तस्करांचा सुळसुळाट आहे.तालुक्यातील गावागावात अनेक तस्करांनी आपले बस्तान मांडले आहे.महाराष्ट्रात चोरबीटी वर बंदी आहे.पण तेलंगणा राज्यात त्याची विक्री सुरू आहे. तेलंगणातून मोठया प्रमाणावर स्वस्तात चोरबीटी आणून तिपटट किंमतीने विकण्याचा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे. चोरबीटी ने आपल्या पिकात वाढ होईल. सोबतच कचऱ्याचा फार त्रास होणार नाही असा समज असल्याने मोठया प्रमाणावर शेतकरी बांधवांनी तस्करांकडून चोरबीटी खरेदी केली.
मागच्या आठवडयात पाऊस येण्याच्या आधी प्रचंड परिश्रमाने शेतकरी बांधवांनी हे बियाणे आपल्या शेतात रोवले. यानंतर तिन चार दिवस सतंतधार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण चोरबीटी चे बियाणे उगवलेच नाही. चोरबीटी बियाणे न उगपिल्याने शेतकरी बांधवांत कमालीचा संताप निर्माण झाला. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट चोरबीटी विक्री करणाऱ्या तस्करांच्या घरावर धाव घेत चोरबीटी उगविली नसल्याने आमचे पैसे परत करा असा सज्जड दम दिला.
गोंडपिपरी तालुक्यात अनेक गावात असे प्रकार घडत आहेत.दरम्यान चोरबीटी तस्करांवर कृषी विभागाने फास आवळला.त्याच्या घराच्या झाडाझळती सुरू आहेत.अशात गावातीलच शेतकरी बियाणे न उगविल्याने पैसे परत मागीत असल्याने तस्करांची चांगलीच पंचाईत होत आहे.अनेक तस्कर डोक्यावर हात मांडून बसले आहेत.
अण्णांचे साम्राज्य
तेलंगणा सिमेला लागून गोंडपिपरी तालुका आहे. गोंडपिपरी तालुक्यात चोरबीटी विकण्यासाठी गावागावात तेलंगणातील अण्णाची टिम सक्रिय आहे.ते स्वत पन्नास,शंभर एकर अशी शेती करतात व शेती दाखवून त्या आडोशाखाली चोरबीटी चा धंदा करतात. असे अनेक प्रकार समोर आले आहेत.

