उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- युसी इंटरनॅशनल एज्युकेशन काऊन्सिल (UNICEF), फ्रान्स यांचे विद्यमाने इंटरनॅशनल होनोरारी अवॉर्ड सेरेमोनी २०२३ यांचे वतीने हाॅटेल द प्लोरा ग्रॅंड गोवा नुसताच संपन्न झाला. यावेळी सांगली चे प्रसिद्ध उद्योगपती, बौध्द धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष सुधिर जंबू कोलप यांना “डॉक्टर ऑफ सोशल वर्क” हा ‘डॉक्टरेट किताब’ देऊन सन्मानित करण्यात आले.
सुधिर जंबू कोलप हे सांगली येथील प्रसिद्ध उद्योगपती, बौध्द धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहारचे अध्यक्ष, तसेच भारतीय बौध्द महासभेचे हितचिंतक व तळागाळातील सर्वांना मदतीसाठी धावून जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्य हे नेहमी इतरांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला कुठेच तोड नाही. त्यामुळे सांगलीचे दानदाते अनाथपिंडक सुधिर जंबू कोलप यांना “डॉक्टर ऑफ सोशल वर्क” डॉक्टरेट किताब देण्यात आला. हा मनाचा पुरस्काराणे सन्मानित करण्यात आल्या बदल सर्व क्षेत्रातून त्यांचे डॉ. सुधिर कोलप यांचे खुप खुप अभिनंदन करण्यात येत आहे. आणि त्यांचा पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

