उमेश इचे, पातूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पातूर:- तालुक्यातील श्री. महाकाल आखाडा जांभरूण (उज्जैन) विद्यमाने श्री. श्री. 1008 महामंडलेश्वर सरस्वती आई राजेश्वरीनंद अम्मा पोन्नालवार यांच्या जांभरूण येथील मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. यल्लामा माता यांची रीतीरिवाजाने पूजा अर्चना करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
आखाडी पासून पाऊसाचा सुरुवात होते. शेतकरी शेत जोतण्याचा कामाला लागतात. पाऊस पडल्यामुळे रोगराई वाढायला लागते. या सर्वापासून नागरिक सुखी समृद्ध संपन्न व्हावे. यावर्षी चांगला पाऊस पडावा, रोगराई नाहीशी व्हावी, शेतात चांगल पीक व्हावे, सर्व नागरिकाचे कल्याण व्हावे म्हणून श्री.श्री.1008 महामंडलेश्वर सरस्वती आई राजेश्वरीनंद अम्मा पोन्नालवार यांच्या हस्ते अभिषेक, होम हवन प्रतिष्ठान करून पूजा करण्यात आली. त्यानंतर गुरूच्या चरणी सेवा अर्पण केली. त्यानंतर अनेक शिष्यांनी गुरूचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी उज्जैन, तेलंगणा भोकरदन, बुलढाणा येथील राजेश्वरीनंद अम्मा पोन्नालवार त्यांचे मोठे गुरु यांना पण वंदन करण्यात आले.

यावेळी अकोला महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका राजेश्वरी अम्मा शर्मा यांनी मध्यरात्री 3.30 वाजता अकोला येथून जांभरूण 45 किलोमीटर पायी चालत आपल्या गुरूला वंदन करून दर्शन घेतले. यावेळी अकोला येथील वच्छला डाखोरे, नंदा तायडे, नितीन चव्हाण, अनिल आठवले, लक्ष्मण दरेकर सर्व राह. अकोला प्रदीप नवलकार राह. आलेगाव, मक्कु कारीया राह. मालेगाव, निलेश तायडे राह. मेडशी, योगिता भोपलेकर, निशांत तायडे राह. अमरावती, सतीश राह. वाशिम, राहुल परदेशी निफाड, आश्विन अंभोरे, पुष्पा शर्मा व पुरुषोत्तम शर्मा, सीमा सुरूशे मालेगाव हे प्रामुख्याने उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक भाविकांनीही गुरूच्या दर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यावेळी श्री. श्री. 1008 महामंडलेश्वर सरस्वती आई राजेश्वरीनंद अम्मा पोन्नालवार म्हणाल्या की, गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे :गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवेद नमः।।वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन ! ज्याप्रमाणे डोळ्यांत अंजन घातले असता दृष्टीचे तेज वाढते त्या दृष्टीने भूमिगत धन दिसू लागते. (दडलेले ज्ञान स्पष्ट दिसू लागणे.) ज्याप्रमाणे हाती चिंतामणी लागल्यास मनुष्याचे सदासर्वदा मनोरथ पूर्ण होतात.यावेळी त्यांनी सर्व शिष्याचे आणि नागरिकांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

