Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

चक्क शरद पवार यांची केली अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार बनले नवे अध्यक्ष.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 6, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
चक्क शरद पवार यांची केली अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार बनले नवे अध्यक्ष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात राजकीय भूकंप झाला. आता त्याचे प्रदसाद दिसायचा सुरुवात झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. खा. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

तेच दुसरीकडे, अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा सांगितला आहे. यासंबंधीचे 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे एक पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 40 आमदारांच्या प्रस्तावाचे दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यात अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे. महत्वाचे म्हणजे या पत्रावर 30 जून ही तारीख आहे. त्यावर निवडणूक आयोगाने आपण दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे शरद पवारांना कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे.

शिवसेने सारखा होईल लढा…
एक वर्षा अगोदर शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची लढाई संपूर्ण राज्यात झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी सादर करण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण सध्या या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहेत. तर दुसरीकडे, शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे.

पवार गटाने कॅव्हेट केली दाखल..
यावेळी शरद पवार गटाच्या वतीने कॅव्हेट केली दाखल करण्यात आली आहे. त्यात म्हटल आहे की, आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष शिवसेनेच्याच वाटेने जात असल्याचे दिसून येत आहे.

बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी….
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी बंडखोरीनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व पक्षचिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर आता त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून या राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ या पक्षचिन्हाची मागणी केली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अजित पवारांच्या गटाच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे 30 हून अधिक आमदार उपस्थित होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 15 हून अधिक आमदारांची हजेरी होती.

Previous Post

राष्ट्रवादी पक्ष फोडण्याच्या कटात निवडणूक आयोगही सामिल; जितेंद्र आव्हाडांचा यांचा खळबजनक आरोप.

Next Post

लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथकांची दमदार कामगिरी ! घरफोडी करणाऱ्या सराईत अट्टल चोराला २४ तासांचे आत ठोकल्या बेडया

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथकांची दमदार कामगिरी ! घरफोडी करणाऱ्या सराईत अट्टल चोराला २४ तासांचे आत ठोकल्या बेडया

लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथकांची दमदार कामगिरी ! घरफोडी करणाऱ्या सराईत अट्टल चोराला २४ तासांचे आत ठोकल्या बेडया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In