पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची बातमी प्राप्त करून त्यांचे विरुद्ध कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते.. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखे कडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेन्द्र कदम, अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत असताना पोलीस नाईक १४५८ आशिष बनकर व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर यांना मिळालेल्या बातमीवरून दि. २५/०६/२०२३ रोजी २०/१५ वा दरम्यान तळेगाव दाभाडे एस टी बस स्टैण्ड परिसरातुन सराईत आरोपी टोळी प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर वय ३३ वर्ष रा राळेगाव स्टेशन जवळ, हरणेश्वर वाडी, बौध्द विहार जवळ, तळेगाव दाभाडे, पुणे २. शरद मुरलीधर साळवी, वय ३० वर्षे राधनगर बाबा मंदीर मागे, ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी, पुणे, गुळ रा महारवाडा, अवहारारबाला बदनापुर, जालना यांना – त्यांचेकडील मारुती सुझुकी ऑल्टोकार सह ताब्यात घेवुन १,६०,००० /- रुपये किंमतीचे ०४ गावठी पिस्टल,७,००० /- रुपये किंमतीचे १४ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आले होते. सदरबाबत तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन, येथे गु.र.नं. २९५ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), भा.द.वि.क. ३४ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, हे करीत होते.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान यातील आरोपींकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी त्यांचे साथिदार नामे १. अमित जयप्रकाश परदेशी दय ३१ वर्षे रा. २७५ डोळसनाथ मंदीराशेजारी तळेगांव दाभाडे पुणे. २. मंगेश भिमराव मोरे, वय ३० वर्ष रा माळी नगर वडगाव मावळ ता मावळ जि पुणे च ३. अनिल वसंत पवार, वय ३९ वर्षे, रा. सिध्दार्थनगर, इंद्रायणी कॉलेज शेजारी तळेगाव दाभाडे ता- मावळ, जि. पुणे यांना अटक करण्यात येवुन त्यांनी त्यांचा आरोपी साथिदार नामे ४ अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी वय २८ वर्ष सिधार्थनगर तळेगाव दाभाडे ता मावळ जि पुणे. ५. देवराज रा. जळगाव जामोद, बुलढाणा याचेसह मिळून गया इसमें नागे किशोर आवारे, रा राळेगाव दाभाडे, मावळ, पुणे यांचे मृत्युवा बदला घेण्यासाठी विशिष्ट व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट रचला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडून तपासा दरम्यान एकुण ols पिस्टल व २१ जिवंत काडतुसे (राउण्ड), एक लोखंडी कोयता व एक लोंखडी तलवार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. -सदरये आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार असुन त्यांचे विरुद्ध खून खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवुन गाडयांची तोडफोड करुन जाळपोळ करणे व बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र जवळ बाळगणे असे एकुण २६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयाचे अभिलेखावर दाखल असल्याने तसेच वरील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीत करुन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द दि. ०४/०७/२०२३ रोजी मा. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (ii) ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड हे करीत आहे.
सन २०२३ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ११ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १३९ आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे..
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. विनय कुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे, पोलीस सह आयुक्त, मा. श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिं.चि. मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पि चि. मा. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि-२ पिंप. मा. श्री सतिश माने सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं. मा श्री बाळासाहेब कोपनर सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं. यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, बाळकृष्ण सावंत वपोनि (पीसीबी) गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर सुमित देवकर, सागर शेडगे, महेश खांडे, उमेश पुलगग, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समिर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे…

