रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील बाबुलातारा गावचे भूमीसुपुत्र ज्ञानेश्वर श्रीरंग नाईकवाडे यांची MPSC च्या मंगळवारी लागलेल्या निकालात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शेतकरी कुटूंबातील ज्ञानेश्वर नाईकवाडे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील ज़िल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण केले व पुढील शिक्षण संभाजीनगर येथे घेत असताना mpsc च्या अभ्यासाला सुरुवात केली व त्यांना 2019 यावर्षी पहिल्या प्रयत्नात यश मिळाले पण मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे त्यांची 1 मार्कांने ओपन मधून संधी हुकली त्या परिस्थितीला न डगमता घरची परिस्थिती खूप हालाकीची असताना त्यांच्या आई वडिलांनी शेतात मजमजुरी करून आपल्याला शिकवलं हे सगळं डोळ्या समोर ठेऊन त्यांनी परत नव्याने तयारी चालू केली व 2020 च्या परीक्षेत तब्बल साडे तीन वर्षांच्या कालावधीनंतर अखेर यशाला गवसनी घातली.
बाबुलातारा गावातली पहिले अधिकारी झालेले ज्ञानेश्वर नाईकवाडे यांचे गावातील सर्व मित्र मंडळी व गावाकऱ्यांनी अगदी मोठ्या थाटामाटात स्वागत केले त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असताना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, गुरुजन वर्ग व मित्र मंडळींना दिले आहे.

