आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत राष्ट्र समितिचे गुलाबी वादळ नंदोरी गावात दाखल झाले आहे. यावेळी नंदोरी गावात डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात गावातील महीला मंडळीनी यांनी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ग्रामस्थाच्या भारत राष्ट्र समितीला चांगला प्रतिसात मिळाला.
यावेळी या सभेला डॉ. उमेश वावरे यांनी संबोधित केले. या वेळी ते बोलताना म्हणाले की, तेंलगणा सरकार मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेृत्वाखाली 124 फुट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाची स्थापना केली कुणाची मागणी नसताना, सचिवालयाला नाव दिले. बेरोजगारीसाठी दलित बंधु योजना राबविनात येते त्यामध्ये बेरोजगाराना 10 लाखाची आर्थिक मदत देण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. अशा विविध योजना तेंलगणा सरकार राबवत आहे.
पुढे बोलताना डाॅ. उमेश वावरे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात भारत राष्ट्र समितीला पाठिंबा मिळत आहे, महाराष्ट्र भारत राष्ट्र समितीची सत्ता आली तर हे सरकार शेतकऱ्याच, कामगारच, मजुराच, सर्व धर्म समभाव असणारे सरकार असेल. सर्वांचा विकास करणारे सरकार असेल.
यावेळी मनिष कांबळे, गुड्ड नादेकर, रविन्द्र भगत, युवराज दिवे, वंदना नारायणे, विघा दिवे, अस्मिता गोडघाटे, वर्षा ढोके, रामकृष्ण बाटबवे, राजकुमारी दिवे, कुंता खेडकर, पोर्णिमा मेश्राम, मंगल खेडकर, कुसुम खेडकर, संगीता मेश्राम, सुशीला ऊईके, जानुबाई मेश्राम, छिळाबाई मेश्राम, कुन्ता मेश्राम, सुकळा भस्मे, काताबाई येरणे, वंदना रामटेके, युवराज दिवे, पंकज गोडघाटे, निर्मला मोजे, प्रतिभा वाकडे, वंदना चिकाटे, वागेश्वरी राऊत, नर्मदा पाटिल, विमल भगत इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

