अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला: – सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची दखल घेत महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी हुतात्मा चौकात गतिरोधक बसविले. दि.१०/३/२०२३ रोजी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना हुतात्मा चौकात गतिरोधक बसवा कारण अशोक वाटीका कडुन गौरक्षण रोड कडे व निमवाडी उड्डाणपूल वरून मुर्तिजापूर कडे जाणारे वाहन सुसाट वेगाने चालतात. वाहतुक पोलिस कर्मचारी यांच्यावर या चौकातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी फार मोठा ताण राहतो.
या हुतात्मा चौकात रोजच छोटे मोठे अपघात घडत असतात. नुकताच हुतात्मा चौकात एक ट्रक व दुचाकी अपघात झाला व तिघांचा मृत्यू झाला म्हणुन अपघातचे प्रमाण रोखण्यासाठी हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात यावे यासाठी निवेदन दिले होते. सामाजीक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या निवेदनाची दखल घेऊन हुतात्मा चौकात गतिरोधक बसविण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी तथा सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

