Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

बीड: शेतकऱ्यांच्या मागणीची खा. प्रितम मुंडे यांच्याकडून तात्काळ दखल, पीक विमा भरण्यास दोन आठवडे मुद्दतवाढ द्या; मुख्यमंत्री, कृषी सचिवांना पत्र.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 10, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बीड: शेतकऱ्यांच्या मागणीची खा. प्रितम मुंडे यांच्याकडून तात्काळ दखल, पीक विमा भरण्यास दोन आठवडे मुद्दतवाढ द्या; मुख्यमंत्री, कृषी सचिवांना पत्र.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन बीड:- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात राबविण्यात येत असलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेस मुद्दतवाढ देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून केली जातं होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन खा. प्रितमताई मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी विभागाच्या सचिवांशी पत्र व्यवहार केला आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजनेस दोन आठवडे मुद्दतवाढ देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली नसल्याने आणि पावसाच्या विलंबामुळे शासनाच्या विहित मुद्दतीत पिकांचा विमा उतरवणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, ही बाब निदर्शनास येताच खा.प्रितमताई मुंडे यांनी शेतकऱ्यांची मागणी शासन दरबारी मांडली.

सद्यस्थितीत मराठवाड्यात आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने बहुतांश भागात पीकपेरा झाला नाही .अपुऱ्या पावसाअभावी खरीप पेरणी रखडली आहे. बीड जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्राच्या पस्तीस टक्केपेक्षा कमी क्षेत्रात पेरणी झाल्याचे चित्र आहे. पावसाअभावी पेरणीस विलंब होण्याची चिन्हे असल्याने शासनाच्या अंतिम मुद्दतीत बदल करून दोन आठवड्यांची मुद्दतवाढ देण्यात यावी अशी मागणी खा. प्रितमताई मुंडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल शेतकरी वर्गामधून खा. प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले जात आहेत.

सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राज्य सरकार सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवित आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना केवळ एका रुपयात विम्याचे संरक्षण मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खा.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.तसेच विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क आकारण्यात येणार असल्याने ग्राहक सेवा केंद्र अथवा इतर ठिकाणी शेतकऱ्यांनी अधिकची रक्कम देऊ नये. शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क मागण्याचे प्रकार निदर्शनास आले तर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना देखील जिल्हा कृषी अधीक्षकांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

गुन्हे शाखा युनिट १ची दमदार कामगिरी ! बुधवार पेठ येथे बेकायदेशीर रित्या पिस्टल बाळगणा-या सराईतास केले जेरबंद

Next Post

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा कारवाईचा धडाका सुरूच आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०२ गुन्हेगारी टोळ्यावर मोका अंतर्गत करवाई.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा कारवाईचा धडाका सुरूच आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०२ गुन्हेगारी टोळ्यावर मोका अंतर्गत करवाई.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा कारवाईचा धडाका सुरूच आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०२ गुन्हेगारी टोळ्यावर मोका अंतर्गत करवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In