Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा कारवाईचा धडाका सुरूच आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०२ गुन्हेगारी टोळ्यावर मोका अंतर्गत करवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 10, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा कारवाईचा धडाका सुरूच आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०२ गुन्हेगारी टोळ्यावर मोका अंतर्गत करवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा सुरुच ठेवला आहे .दोन दिवसापूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०३ टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१),३(४)या कलमानुसार मोका अंतर्गत कारवाई केली असताना आता दुसऱ्या ०२ टोळ्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. चाकण आणि पिंपरी पोलीस ठाणे हद्दीतील या दोन टोळीचा समावेश असल्याची माहिती पोलिसाकडून देण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहिती नुसार चाकण पोलीस ठाणे अंतर्गत टोळी प्रमुख १) गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण वय २८ वर्षे, रा.मराठी शाळेजवळ, लोणीकंद, ता.हवेली जि. पुणे व त्याचे इतर ०२ साक्षीदार यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्र त्यांच्याविरुद्ध दरोडा घालणे,जबरी चोरी, विश्वासघात करून चोरी करणे, विना परवाना हत्यार बाळगणे, असे एकूण १० गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत टोळीप्रमुख १) अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय ३०,वर्ष रा. व्ही, -६ मिलिंद नगर पिंपरी ))आणि त्याचे इतर १५ साथीदार यांच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यांच्या विरोधात खून करण्याच्या उद्देशाने, अपहरण करणे ,खुनाचा प्रयत्न करणे, कट रचने, पुरावा नष्ट करणे, दरोडा दरोडयाची तयारी करणे, जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सदोष मनुष्यवध करणे, विनयभंग करणे, खंडणी मागणे, दुखापत करणे सार्वजनिक मालमत्तेचे तोडफोड करणे, गैरकायदयाची मंडळी जमवणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ वागणे, असे एकूण २१ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

वरील दोन्ही टोळ्यांमधील सर्व आरोपी यांनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी असंघटित गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे .पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सन २०२३पर्यंत आज पर्यंत १६ संघटित गुन्हेगारी टोळ्यांतील एकूण १८७,आरोपीवरमोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे (पी.सी.बी गुन्हे अतिरिक्त कार्यभार चाकण) पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ राम राजमाने, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पीसीबी गुन्हे शाखा व्यंकप्पा, कारभारी, चाकण पोलीस स्टेशन पोलीस नाईक नितीन गुंजाळ पिंपरी पोलीस नाईक ओंकार बंड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous Post

बीड: शेतकऱ्यांच्या मागणीची खा. प्रितम मुंडे यांच्याकडून तात्काळ दखल, पीक विमा भरण्यास दोन आठवडे मुद्दतवाढ द्या; मुख्यमंत्री, कृषी सचिवांना पत्र.

Next Post

गडचिरोली; मुस्लिम समाजावरील अन्याय अत्त्याचार थांबवण्यासाठी वंचितच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली; मुस्लिम समाजावरील अन्याय अत्त्याचार थांबवण्यासाठी वंचितच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा.

गडचिरोली; मुस्लिम समाजावरील अन्याय अत्त्याचार थांबवण्यासाठी वंचितच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In