Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाहन तोडफोडीसह मोक्याच्या गुन्हयात ०३ महिन्यापासुन फरार असलेले ०३ पाहिजे आरोपी गुन्हे शाखा युनिट ४ कडुन बंगलुरु राज्य कर्नाटक येथून अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
July 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाहन तोडफोडीसह मोक्याच्या गुन्हयात ०३ महिन्यापासुन फरार असलेले ०३ पाहिजे आरोपी गुन्हे शाखा युनिट ४ कडुन बंगलुरु राज्य कर्नाटक येथून अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो. पुणे शहर यांनी पुणे शहरातील दाखल गुन्हयातील व मोक्का मधील पाहिजे / फरारी आरोपी यांचेबाबत विशेष मोहीम राबवुन ते मिळुन आल्यास त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीता मा. न्यायालयासमोर हजर करणेबाबत आदेश दिले आहेत. प्राप्त आदेशाचे अनुषंगाने मा. श्री. गणेश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ४, पुणे शहर यांनी वरिलप्रमाणे विशेष मोहिम राबवुन कार्यवाही करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. प्राप्त आदेश व सुचनेप्रमाणे पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील, सोबत पोलीस हवालदार ३८६४ प्रविण भालचीम. पोलीस नाईक ६९३८ सारस साळवी यांनी पोलीस ठाणे चतुःश्रृंगी गुन्हा रजि. क्र. २७३ / २०२३ भा. द. वि. कलम १२०(ब) ३०७, ४२७ ३२३, ५०४, ५०६ (२) १४३, १४७, १४८, १४९, भारताचा हत्यार कायदा कलम ४/२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५. क्रिमीनल ला अर्गेडगेट कायदा कलम ७ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) या गुन्हयातील पाहिजे आरोपी यांचेबाबत गोपनिय माहीती काढण्याचे काम करीत होते. पोलीस नाईक सारस साळवी, पोलीस हवालदार प्रविण भालचीम यांना त्यांचे बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, “अजय विटकर व बबल्या देवकुळे हे बेंगलोर राज्य कर्नाटक येथे लपून-छपून राहत आहेत.” मिळालेली बातमी मा. वरिष्ठांना कळविली असता त्यांनी नमुद ठिकाणी तात्काळ स्टाफ पाठवुन आरोपीतांना कायदेशीर कारवाई कामी ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले, त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील सोबत पोलीस हवालदार ३८६४ प्रविण भालचीम, पोलीस नाईक ६९३८ सारस साळवी, पोलीस अंमलदार ८२९३ रमेश राठोड यांचे तपास पथक दि ०९/०७/२०२३ रोजीचे रात्री बंगलुरु राज्य कर्नाटक करीता रवाना करण्यात आले.

दि. १०/०७/२०२३ रोजी तपास पथकाने थलगटपुरा पो स्टे बंगलुरु शहर, कर्नाटक राज्य परिसर येथे जावुन दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचेबाबत अधिक माहिती घेतली असता ते राजहंस ग्रिन गंगल कार्यालय येथे असलेबाबत माहीती प्राप्त झाली. प्राप्त माहीतीची खात्री करून अचानक छापा कारवाई करून आरोपी नामे १) अजय चंद्रकांत विटकर, वय २२ वर्षे, रा. ब्लॉक नं. २३. हरिहरेश्वर सोसायटीसमोर, जुनी वडारवाडी, गोखलेनगर, पुणे २) ऋषिकेश ऊर्फ बबल्या सुनिल देवकुळे, वय १९ वर्षे, रा. धोत्रे बिल्डींगसमोर, कुसाळकर १००१ वडारवाडी, गोखलेनगर, यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्यातील त्यांचे इतर साथीदारांबाबत कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी त्यांचा साथीदार “अनिल ऊर्फ डॅनी गंगळवेढेकर हा अहमदनगर येथील एम. आय. डी. सी. “भागात लपुन राहत आहे” अशी माहीती दिली. मिळालेली माहीती मा वरिष्ठांना अवगत करण्यात आली. मा. वरिष्ठांनी लागलीच गुन्हे शाखा युनिट ४, पुणे शहर कडील पोलीस हवालदार २२६९ संजय आढारी, पोलीस नाईक ८७३ नागेशसिंग कुंवर, पोलीस नाईक ७४५३ विनोद महाजन यांचे पथक अहमदनगर करीता रवाना केले. नमुद पथकाने अहमदनगर एमआयडीसी येथे जावुन गोपनिय माहीती प्राप्त करून एमआयडीसी अहमदनगर परीसरातुन आरोपी नामे अनिकेत ऊर्फ डॅनी शंकर मंगळवेढेकर, वय २२ वर्षे, रा. ब्लॉक नं. ३३, डॉ. भाभा हॉस्पीटलजवळ, मारुती मंदिराजवळ, वडारवाडी, गोखलेनगर, पुणे यास शिताफीने ताब्यात घेतले. नमुद तिन्ही आरोपीतांना पुढील कारवाईकरीता सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. आरोपींतांची पोलीस कोठडी रिमांड घेवून त्यांच्याकडे पुढील तपास करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा श्री. अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील, श्रेणी पोलीस उप निरीक्षक महेंद्र पवार व पोलीस अंमलदार प्रविण भालचिम, सारस साळवी, रमेश राठोड, संजय आदारी, नागेश कुवर, विनोद महाजन, विठ्ठल वाव्हळ या युनिट ०४ चे पथकाने केलेली आहे…

Previous Post

मुलामुलींच्या साचेबद्ध घडवणुकीत एकतर्फी प्रेमातून हत्यांची बीज आहेत: कल्याणी दुर्गा रवींद्र

Next Post

सांगलीत मुस्लिम, बहुजन समाजावर वाढत्या अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सांगलीत मुस्लिम, बहुजन समाजावर वाढत्या अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा.

सांगलीत मुस्लिम, बहुजन समाजावर वाढत्या अत्याचारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In