उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली, दि. ११ जुलै:- संपूर्ण देशात आणि राज्यात मुस्लिम व बहुजन समाजावर अत्याचाराच्या घटना वाढत असून मुस्लिम, बहुजन समाजाला जाणीवपूर्वक जातीयवादी शक्तिकडून लक्ष्य केले जात आहे त्याच्या निषेधार्थ मंगळवार दि. ११ जुलै २०२३ रोजी महात्मा गांधी पुतळा ते कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा या ठिकाण पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.
मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील परळीमध्ये मुस्लिम समाजातील जरीन खान या युवकाचा पोलिस मारहाणीत मृत्यू झालेला आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवकाचा पोलिस कस्टडी मध्ये मृत्यू झाला आहे. नांदेड या ठिकाणी अक्षय भालेराव याचा निर्घृण खून करण्यात आला त्याच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी वंचित बहुजन आघाडी मागणी करीत आहे. त्याचप्रमाणे स्टेटसच्या कारणावरून मुस्लिम कुटुंबावर हल्ले होताना दिसत आहेत. तरी मुस्लिम व बहुजन समाजावर होत असलेले हल्ले थांबले पाहिजेत अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे युवा नेते इंद्रजीत घाटे अल्फाज जमादार यांनी केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा महासचिव राजू मुलानी, श्रीकांत होवाळे सरचिटणीस संपर्कप्रमुख नझीर हुसेन झारी, चंद्रकांत खरात, मीडिया प्रमुख ऋषिकेश माने अशोक लोंढे गौतम लोटे महापालिका क्षेत्राध्यक्ष आनंद सागर पुजारी महासचिव सागर ओमासे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ लोंढे केतन माने रहीम कवठेकर, परवेज इनामदार, मोहमद केडीया, मानतेश कांबळे, चंद्रकांत कोलप, दीपक कांबळे, अनिल सावंत, प्रमोद मल्लाडे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय आठवले महासचिव सुरज वाघमारे तासगाव तालुकाध्यक्ष सनी गायकवाड महासचिव पृथ्वीराज कांबळे तासगाव शहराध्यक्ष शिवाजी गुळवे मिरज विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत कोलप मिरज तालुकाध्यक्ष विशाल धेंडे महासचिव सागर आठवले मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष जत विठ्ठल पुजारी जत तालुकाध्यक्ष अमोल साबळे महासचिव हारून नइनामदार सचिन कोलप आदी आधी मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.

