संदिप सुरडकर नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपुर येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात नेमक चाललंय तरी काय, महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असे प्रश्न विचारण्यात येत आहे. नागपुर येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका खासगी हॉटेलमध्ये बिकनी स्टाईल कपडे घातलेल्या तरुणीचा अश्लील डान्स सुरू होता. अश्लील डान्स करत अस तरुणीसाठी शिट्ट्या वाजवत होते आणि त्यासोबत तिच्यावर पैसेही उडवत होते. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या तरुणीच्या अश्लील डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. तरुणींवरवर पैशाची सिनेस्टाईल उधळण केल्यास व्हिडीओमध्ये दिसत आहे.
एका खाजगी सोलर कंपनीकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागपूर पोलिसांनी हॉटेलमध्ये आयोजित होणाऱ्या कार्यक्रम यांना कडक दिशानिर्देश दिले असताना देखील शहरातील नामांकित हॉटेलमध्ये अशे कार्यक्रम आयोजित होत आहे. नियमांना केराची टोपली दाखवत अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या हॉटेल मालकावर आता काय कारवाई होणार ते पाहावं लागणार आहे. तर दुसरीकडे असे अश्लील प्रकार कधी थांबणार असा संतापजनक प्रश्न देखील युजर्स ट्विट करुन विचारत आहेत.

