विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- पाल्याच्या आरोग्याची जबाबदारी आईसारखी दुसरे कोणीही घेऊ शकत नाही. उत्तम शिक्षण मिळण्यासाठी विद्यार्थी वेळेवर शाळेत गेला पाहिजे तसेच त्याचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे आणि ही जबाबदारी प्रत्येक पाल्याची आई समर्थपणे सांभाळू शकते असे प्रतिपादन इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयात आयोजित माता पालक मेळाव्यात प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांनी केले. आजच्या आधुनिक युगात फास्ट फूड कडे वळणारी मुले वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांना घरी बनवलेले अन्न मिळणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले.
प्रास्ताविकामध्ये निर्मला लावरे यांनी पालक संघाची उद्दिष्टे, हेतू व वैशिष्ट्ये स्पष्ट केले.
शिक्षक मनोगतामध्ये वृषाली बेल्हेकर यांनी माता पालक संघाचे महत्त्व व आईची आपल्या पाल्याविषयीची जबाबदारी याची जाणीव करून देत उपस्थित माता- भगिनींना मार्गदर्शन केले. सविता अष्टेकर, जयश्री बिडवे यांनी ही आपली मते मांडत चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी माता पालक संघाच्या उपाध्यक्षा जयाताई जेजुरकर तसेच आरोग्य सेविका अंजली नळे, सौ. अश्विनी बिडवे, अंजली नळे, संगीता गाडेकर, लता त्रिभुवन, सीमा जेजूरकर, स्वाती तरटे, सुवर्णा राऊत, मनीषा लोंढे, वर्षा त्रिभुवन यांसह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ही सभा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या उपशिक्षिका कविता घोडसरे, पल्लवी चोळके व पल्लवी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले.
सभेचे सूत्रसंचालन छाया जेजुरकर यांनी केले तर उपशिक्षिका प्रतिक्षा थोरात यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

