Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगाराच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शिंदे फडणवीस पवार सरकारने केले तरुणाची संतप्त प्रतिक्रिया.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 13, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगाराच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शिंदे फडणवीस पवार सरकारने केले तरुणाची संतप्त प्रतिक्रिया.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप, मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शासनाने नौकरभर्ती बंद करून खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरुण तरुणी सरकारी नोकरी आशा लाऊन बसले होते त्याच्यात निराश पसरत आहे. त्यामुळे तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

जर शिक्षक 70 व्या वर्षापर्यंत अध्यापनाचे कार्य करू शकतात, तर मग त्यांना 58 व्या वर्षी निवृत्त का करता? निवृत्त केल्यानंतर पुन्हा कंत्राटी पद्धतीवर त्यांना घेण्याचा शासन निर्णय कशाला काढला, असा सवाल करत टीईटी पास झालेले भावी शिक्षकांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. सेवानिवृत्त शिक्षकांनाच कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा शासनाचा निर्णयावर भावी शिक्षकांकडून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सुमारे 20 वर्षा अगोदर डीएड, बीएड झाला म्हणजेच हमखास नोकरी मिळाली , असे समजत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक युवा हा डीएड होऊन शिक्षक होण्याचे स्वप्न रंगवत होते. त्यात आई वडील पण आपल्या पाल्यासाठी पहिली पसंती डीएडला देत होते. मात्र, शासनाच्या एका निर्णयाने नव्वद हजार टीईटी पास झालेले भावी शिक्षक कंत्राटी शिक्षक होण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

राज्यातील अनेक जिल्हात शासनाच्या शाळेतील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहे. अनेक ग्रामीण भागातील शाळा शिक्षका अभावी ओस पडल्या आहे. नुसत्याच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊनही अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने रिक्त पदांवर शिक्षकभरती होईपर्यंत सेवानिवृत्त शिक्षकांनाच कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित शिक्षक भरती उच्च न्यायालयातील रिट याचिकांमुळे लांबल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षकभरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत हा उपाय काढण्याचा निर्णय सरकारने घेतला.

यानुसार महानगर पालिका, जिल्हा परिषद, व खासगी शिक्षण संस्था, तसेच अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमार्फत कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती रिक्त पदे भरली जातील. त्यामुळे पुन्हा एकदा नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बेरोजगार भावी शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शिंदे-फडणवीस पवार सरकारने केले असल्याची संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून उमटत आहेत.

नव्वद हजार TET पास झालेले भावी शिक्षक उपलब्ध असताना सेवानिवृत्त शिक्षकांना पाचारण करणे, हे कोणते आधुनिक धोरण आहे, हे कळायला मार्ग नाही. आज नाही परंतु दहा वर्षांनी या अविचारी निर्णयाचे दुष्परिणाम समाजाला भोगणे अपरिहार्य दिसते , अशी तिखट प्रतिक्रियाही भावी शिक्षकांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

५८ व्या वर्षी थकले म्हणून निवृत्त केलं आणि तेच शिक्षक वयाच्या सत्तरी पर्यंत ताजे तवाने झाले खरं तर सरकार तरुण मुलांच्या आयुष्यातून सर्व्हिसचे वर्ष कमी करत आहे. आम्ही अभियोग्यताधारक या काळ्या जीआरचा निषेध करत आहोत.

वय झाल्यामुळे शारीरिक क्षमता कमी होते अध्यापनात अडसर होतो म्हणून कर्मचाऱ्यांना निवृत्त केले जाते आणि इकडे शासन तरुणांना सोडून वृद्धांना संधी देत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया अभियोग्यधारक उमेदवारांकडून उमटत आहेत.

Previous Post

खाजगी प्रवासी वाहनाचे परवाणे, प्रमाणपत्र, वहन क्षमता तपासाणीचे निर्देश, बसमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यकता.

Next Post

सावनेर मधील रस्ते मरण झाले स्वस्ते, गणेश मंदिर रस्ता की पांधन रस्ता, जीव गेल्यावर जगणार काय प्रशासन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर मधील रस्ते मरण झाले स्वस्ते, गणेश मंदिर रस्ता की पांधन रस्ता, जीव गेल्यावर जगणार काय प्रशासन.

सावनेर मधील रस्ते मरण झाले स्वस्ते, गणेश मंदिर रस्ता की पांधन रस्ता, जीव गेल्यावर जगणार काय प्रशासन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In