आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये संस्कार राठोड या मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन धाराशिव:- तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील इयत्ता पहिल्या वर्गात शिकत असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्कार राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या ताप्यासह घटना घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तुळजापूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
एकलव्य आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये संस्कार राठोड या मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या झाला असून आई-वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात तुळजापूर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून तपास पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे तुळजापूर पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मुलाच्या आईने चौकशीची मागणी केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

