पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ 7020794626
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एका कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या आगीची भीषणता इतकी जास्त होती की दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते.
आज सकाळच्या सुमारास कोंढवा बुद्रुक येथील येवलेवाडीतील एका कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच ताबडतोब अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाले.
परिसरात धुळीचे लोट :-
कोंढवा पोलिस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी गाव येथे येवलेवाडी कमानी जवळ दीपचंद धर्मचंद शहा या फॅब्रिक कंपनीचे गोडाऊन आहे. येथेच आज सकाळी आग लागल्यामुळे गोडाऊन मधील फॅब्रिक मटेरियलने पेट घेतला. त्यामुळे परिसरात आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले..
कोंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी गाव येथे येवलेवाडी कमानी जवळ दीपचंद धर्मचंद शहा या फॅब्रिक कंपनीचे गोडाऊनला पहाटे आग लागल्यामुळे गोडाऊन मधील फॅब्रिक मटेरियलने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठले आहेत सदर ठिकाणी प्रत्यक्ष गोडाऊन व आजूबाजूचा रेसिडेन्सी एरिया यामध्ये सुरक्षित अंतर असून जीवित हानी कोणत्याही प्रकारचे झालेली नाही. तसेच शेजारील बिल्डिंग मधील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सदर ठिकाणी कोंढवा पोलीस स्टेशन चे व पोलीस निरीक्षक व कर्मचारी हजर असून फायर ब्रिगेडचे नऊ बंब आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहे. अशी माहिती कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली आहे.
येवलेवाडी येथे गोडाऊनमधे भीषण आग लागल्याचे समजताच, पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण 9 अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आली. आग विझवण्याचे काम सुरू असून हे गोडाऊन कापड, पडद्याचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

