मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
मोबाईल-8657345916
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- अतिवृष्टीमुळे डोंगरावरील दगड कोसळून पाइपलाइन वर येऊन कोसळला त्यामुळे पाइपलाइन फुटली व स्थानिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती. शिवसेना ठाकरे यांच्या पक्षातील स्थानिक नगरसेविका स्नेहल मोरे यांच्या प्रयत्नाने ती फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली.
पार्कसाईट मधील रामनगर पट्ट्यातील जंजिरा सोसायटी येथील स्थानिक रहिवाशांना मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे मोठी समस्या भेडसावत होती. अतिवृष्टीमुळे डोंगरावरील दगड हे पाईप लाईनवर आपटल्याने सदर पाईपलाईन फुटली होती. पाईपलाईन फुटल्यामुळे स्थानिकांना त्या ठिकाणी पुरेसं पाणी मिळत नाही, अशी तक्रार स्थानिकांच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झाली असता, मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाला घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच तात्काळ आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवावेत, असे निर्देश दिले.
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता महिला पदाधिकाऱ्यां समवेत घटनास्थळी धाव घेतली. महानगर पालिकेच्या माध्यमातून फुटलेली पाईपलाईन जोडण्याकरिता चालू असलेल्या कामाची पाहणी केली.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल होऊ नये, याकरिता महानगरपालिकेच्या माध्यमातून पाण्याची फुटलेली लाईन जोडण्याचे काम युद्धपातळीवरती चालू आहे. सदर कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल, तसेच विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येईल. स्थानिक जनतेने चालू असलेल्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.
प्रसंगी घाटकोपर (प.) विधानसभा महिला उपविभाग संघटिका सौ. कमलताई चिंचपुरे, जल-विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. वंजारी साहेब, विधानसभा समन्वयक श्री. दत्तात्रय निकम, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या प्रमाणात होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

