प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी मोबा. न.8329084432
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- चंद्रपूर जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सेल्फी काढण्याच्या नादाच्या चार युवक घोडझरी तलावात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव येथील चार युवकांचा सेल्फी काढण्याच्या नादात घोडझरी तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार 16 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये मनीष श्रीरामे वय 26, धीरज झाडें वय 27 वर्ष, संकेत मोडक वय 25 वर्ष, चेतन मांदाडे वय 17 वर्ष यांचा समावेश आहे.
शेगाव येथील आठ युवक रविवारी पार्टीसाठी घोडझारी तलाव येथे आले होते. नागभीड येथील घोडाझरी तलाव नैसर्गिक रम्य सौंदर्य नटलेला हा परिसर फारच रम्य आहे. नागभीड तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या घोडाझरी तलावात घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याचे पाठोपाठ तीन जण पडले. सोबतच्या चार सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे घोडझरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही.
घोडझरी तलावात काही मुलं बुडाल्याची माहिती नागभीड पोलीस स्टेशनला प्राप्त होताच. तडका फडकी पोलीस आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम राबविली जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

