मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील महागाव (खुर्द) परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आले होते. त्या वादळी वाऱ्यामुळे महागाव (खुर्द) येथील परदेशी मुत्ता आलाम यांच्या घरावर रात्री 3 वाजता सुमारास गाड झोपेत असताना घरावरती झाळ कोसळल्याने छतावर असलेले टिनाचे पत्रे फुटले पण जीवितहानी झाली नाही. मात्र आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरती असलेले टिनाचे पत्रे फुटून खूप नुकसान झाले होते.या माहिती गावातील नागरिक व कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच त्वरित वेळाचे विलंब न करत महागाव (खुर्द) गावातील परदेशी मुत्ता आलाम कुटुंबियांचे भेट देऊन घराचे पाहणी केले. शासन तर्फे आताच नुकसान भरपाई मिळत नाही याकरीत. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आलाम कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी उपस्थित महागाव (बु) ग्रामपंचायतचे सदस्य राजु दुर्गे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, उमा मडगुलवार उपसरपंच, प्रमोद रामटेके, श्रीनिवास आलाम माजी सरपंच, गणेश चौधरी, उदेश आलाम, शुभनराव मडावी, गुलाबराव मडावी, लक्ष्मी आलाम, अजय नैताम, चंद्रा कोरेत, तुळशीराम मडावी, दशरथ मेश्राम, भीमराव कोरेत, लखमा सडमेक, बंडू सडमेक, आमसा सडमेक, अशोक आउत्कर, गंगाराम सेडमाके, मंदा मडावी, विनोद रामटेके, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

