रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पावसाळी अधिवेशनाच्या धर्तीवर दि.२० जुलै २०२३ रोजी मुंबई मंत्रालयावर गायरान धारकांचा भव्य राज्य व्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्च्यामध्ये प्रमुख्य मागण्या खालील प्रमाणे आहेत, शासकिय गायरान जमिनी / महसूल जमिनी. अतिक्रमण धारकांच्या नावे नियमानूकुल करणे. गायरान धारक भूमिहीनांच्या शेतीचा सातबारा मिळणे. बेघर, अनुसुचित जाती-जमाती आदीवासी भटके भूमिहीनांना घरकुल योजनेचा लाभ देऊन सरसकट मातलाग मालकी हक्काचा करणे.
अश्या विविध मागण्यासाठी या राज्य व्यापी महामोर्चात जालना जिल्हातील तमाम गायरान धारकांनी व वंचीत बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आप-आपल्या कार्य परिसरातील गायरान धारका समवेत मुंबई येथे बहूसंख्येने उपस्थित राहुन बहुजनांच्या अन्याय हक्का साठी अहोरात्र लढणाऱ्या ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहावे असे आवाहन परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे व परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर यांनी केले आहे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

