रत्नु कांबळे, कोकण ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंधुदुर्ग:- मोसमी पावसाने आता कोकण किनारपट्टी भागात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गुरुवारी दिवसा उसंत घेत वाटचाल करणारा पाऊस रात्री तुफान बनून मोठ्या प्रमाणात बरसला. शुक्रवारी सकाळ पासून जोरदार पाऊस कोसळल्या सुरुवात झाली होती. पुढील दोन दिवस कोकणातील पाचही जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये गुरुवार व शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती.
पश्चिम वार्याचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर अंतरावर असल्याने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक प्रमुख नद्यांमध्ये पूरजन परस्थिती निर्माण झाली आहे. त्यात कणकवली तालुकातील जानवली नदीने धोक्याची पायरी ओलांडली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

